परतूर : शहरातील काही भागांत दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
परतूर शहराला शुद्ध पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या योजनेतून शहरातील सन्मित्र कॉलनी, विठ्ठलनगर व अक्षयनगर भागात मागील पंधरा दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. या पाण्यामध्ये आळ्या, चाटूही येत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारदेखील करण्यात आली आहे; परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. याकडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
शहरातील काही भागांत दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. आम्ही पाईपलाईनला कुठे गळती लागली आहे याचा शोध घेत आहोत. लवकरच ही अडचण दूर केली जाईल.
अतुल देशपांडे, पाणीपुरवठा विभागप्रमुख, न. प.