गडकरी यांनी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उकिरडे यांना भेटून मागणी करण्याचे सांगितले. त्यानुसार आर्दड यांनी त्यांची भेट घेऊन हा पूल राजाटाक्ळी येथै होणे सर्व दृष्टीने कसे लाभदायी आहे, हे समजावून सांगितले. याबद्दल वास्तव सर्वेक्षण करून नंतर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या आर्दड यांच्या निवेदनानंतर अधिकाऱ्यांनी त्या परिसरात सर्वेक्षण केले आहे. एकूणच हा पूल गोपतपिंपळगात येथून होण्यासाठी आमदार पवार यांनी पाठपुरावा केला होता. त्यांची भेट घेऊन आपण त्यांच्याकडेही हा पूल राजाटाकळी येथे कसा फायदेशीर होईल याची माहिती देऊन विनंती केल्याचे आर्दड म्हणाले.
नसता न्यायालयात धाव घेऊ...
आज आपण लोकाशाही मार्गाने जात आहोत. सर्व ज्येष्ठांची भेट घेऊन त्यांना विनंती करून हा पूल राजाटाकळी येथे कसा सर्वच दष्टीने लाभदायी आहे, हे समजावून सांगितले. परंतु एवढे करूनही जर यंत्रणांनी ऐकले नाही, तर आपण या गंभीर मुद्द्यावरून थेट न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत.
सुनील आर्दड, भाजपचे नेते तथा रहिवासी राजाटाकळी