शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका पदभरती परीक्षेत बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:48 IST

नगर परिषद पदभरती परीक्षेत शर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करून पेपर सोडविणाºया सात परीक्षार्थींना पोलिसांनी रविवारी अटक केली.

जालना : नगर परिषद पदभरती परीक्षेत शर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करून पेपर सोडविणाºया सात परीक्षार्थींना पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक अल्पवयीन आहे.कृष्णा साहेबराव भवर (२१), कृष्णा रमेश दांडगे (२७), नलालसिंग महाजनसिंग सुंदर्डे, प्रदीप बदामसिंग सुलाने, प्रदीप हरिओम गुसिंगे, विक्रम धरमसिंग जारवाल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जालना, परतूर, अंबड आणि भोकरदन नगर परिषदेच्या लिपिक टंकलेखक, फायरॅन, तारतंत्री, उद्यान सहायक, पंपचालक, वाहनचालक, प्रयोगशाळा सहायकपदांच्या ३३ जागांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी ११ केंद्रांवर सकाळी परीक्षा झाली.पेपर सुरू झाल्यावर काही वेळात जेईएस महाविद्यालयातील केंद्रावर आलेल्या नायब तहसीलदारांच्या भरारी पथकाने परीक्षार्थींची झडती घेतली असता, त्यांना या परीक्षार्थींकडे मोबाइलसदृश्य इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सापडले.पथकाने पोलिसांच्या मदतीने परीक्षार्थींना सदर बाजार पोलीस ठाण्यात आणले. विक्रम धरमसिंग जारवाल याचे हॉलतिकीट तपासले असता तो दुसºयाच्या नावाने परीक्षा देत असल्याचे समोर आले.>शर्टमध्ये बसवले डिव्हाईसया परीक्षार्थींनी शर्टमध्ये अत्यंत चालाखीने इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बसविले होते. त्यातून पेपर स्कॅन होऊन केंद्राबाहेर जात होता. पकडण्यात आलेले सर्व परीक्षार्थी लिपिकपदासाठी अर्ज केलेले होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.यापूर्वी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या परीक्षेत असा प्रकार समोर आला होता. यात मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे.- शिवाजीराव जोेंधळे, जिल्हाधिकारी, जालना