शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीत खदखद ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:47 IST

वर्षभरापूर्वी जालना नगरपालिकेत सत्ता मिळविलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये कमालीची खदखद पसरलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वर्षभरापूर्वी जालना नगरपालिकेत सत्ता मिळविलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये कमालीची खदखद पसरलेली आहे. ठराविक नगरसेवकांना कोट्यवधींची कामे दिली जात असून, इतरांना दडपशाहीने जेरीस आणण्याचा डाव खेळला जात आहे. गटातटाच्या राजकारणाला कंटाळून काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून, त्यांचा लवकरच पक्षप्रवेशही होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.वर्षभरापूर्वी जालना नगर पालिकेच्या ६१ वॉर्ड आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने निकालानंतर पालिकेत आघाडीची सत्ता आली.त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शहरातील विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे. या निधीतून केवळ भाजप नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे केली जात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील ठराविक नगरसेवकांना विकास कामे दिली जात असल्याने सत्तेत असून ‘उपाशी’ राहण्याची वेळ आघाडीच्या नगरसेवकांवर आली आहे. तर काँग्रेसच्या ‘बाहुबली’ नगरसेवकांना कामे दिली जात असल्याने प्रामाणिकपणे काम करणा-या नगरसेवकांमध्ये खदखद आहे.यातील काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून, खा. रावसाहेब दानवे यांनीही आघाडीच्या नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आगामी काही महिन्यांत जालना न.प.ची महापालिका करण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न असून, याच पार्श्वभूमीवर भाजपने शहर व परिसरात ताकद वाढविण्याच्या दृष्टीने राजकीय आयुधे वापरण्यास सुरुवात केली आहे. आघाडीच्या नगरसेवकांना आपल्या तंबूत आणून पालिकेवर सत्ता मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दोन वॉर्डांचा एक प्रभाग असल्याने विकासकामे करताना ‘दादा’ नगरसेवकांनी स्वत:च कामे घेण्यास सुरुवात केली असून, संपूर्ण प्रभागात आपल्यालाच कामे मिळावीत, अशी या नगरसेवकांची भूमिका असल्याने इतर नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी आहे.गटातटाच्या राजकारणामुळे प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करणा-यांमध्ये असंतोष पसरला आहे. आता ही कोंडी या पक्षांचे नेते कसे फोडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.जायचे तर खुशाल जाकाँग्रेस पक्ष सोडण्याची भाषा करणारे केवळ याच पक्षामुळे निवडून आले आहेत. याचा विसर या नगरसेवकांना पडला आहे. शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर अशांचा दोन्ही वेळा पराभव झाला. ज्याला सोडचिठ्ठी द्यायची असेल, त्यांनी द्यावी. पक्ष कुणाला रोखणार नाही.- कैलास गोरंट्याल, माजी आमदार, जालना