लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जागतिक महिला दिनानिमित्त येथील कुबेर नवकार ज्वेलर्सने महिलांना खास संधी उपलब्ध करून दिली आहे. लोकमत सखी मंच सदस्यत्वाची नोंदणी केल्यास सदस्यांना दीडशे रुपयांची चांदीची वस्तू भेट दिली जाणार आहे.कुबेर नवकार ज्वेलर्समध्ये ९ व १० मार्चला सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या वेळेत महिलांना या विशेष संधीचा लाभ घेता येणार आहे.या व्यतिरिक्त सखी मंच सदस्यांना राज्यस्तरीय भाग्यवंत सोडतमध्ये दीड लाखांपासून अकरा हजारांपर्यंत सोन्याचे दागिने जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच वर्षभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ सदस्यांना घेता येणार आहे. अधिकाधिक महिलांनी लोकमत सखी मंच सदस्यत्वाची नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदस्यता नोंदणीनंतर चांदीची वस्तू भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:48 IST