शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिडको प्रकल्प; नवीन सरकार- नवीन जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:08 IST

जालना शहरातील कामगार आणि गरीब मध्यमवर्गातील नागरिकांना औरंगाबादच्या धर्तीवर सिडको प्रकल्प उभारण्यासाठी आता आणखी वाट पाहावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील कामगार आणि गरीब मध्यमवर्गातील नागरिकांना औरंगाबादच्या धर्तीवर सिडको प्रकल्प उभारण्यासाठी आता आणखी वाट पाहावी लागणार आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह तत्कालीन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढकाराने हा प्रकल्प जालना तालुक्यातील खरपुडी येथे प्रस्तावित करण्यात आला होता. सिडकोने त्यासाठी जागाही संपादित केली होती. मात्र, येलो झोन आणि ग्रीन झोनच्या दर युध्दात हा प्रकल्प बारगळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प खरपूडी ऐवजी आता समृध्दी मार्गावरील एखाद्या गावात उभारण्याच्या हालचालींना गती आली आहे.जालना शहराचा विकास हा गेल्या वीस वर्षात चौफेर झाला आहे. त्यामुळे येथील औद्योगिक विकासामुळे हजारो कामगार आणि मध्यवर्ग स्थायिक झाला आहे. या वर्गातील नागरिकांना त्यांना आर्थिक दृष्ट्या परवडतील अशी घरे मिळावीत यासाठी तत्कालीन आघाडी सरकार मधील नगरविकास मंत्री आ. राजेश टोपे यांनी प्रथम हा प्रकल्प जालन्यातील नागेवाडी आणि खादगाव शिवारात आणला होता. परंतु औद्योगिक क्षेत्र यापासून जवळच असल्याने या प्रकल्पाला मंजूरी नाकरण्यात आली. नंतर हा प्रकल्प जालना तालुक्यातील खरपूडी येथे उभारण्यासाठीची जागा निश्चित करण्यात आली. त्यासाठी सिडकोने अध्यादेश काढून जागेची मोजणी तसेच संपादनाची प्रक्रियाही सुरू केली होती.ही मोजणी सुरू असतांना या परिसरातील शेतकऱ्यांचा याला विरोध होता. ग्रीन आणि येलो झोन असे जमिनिचे विभाग पडत असल्याने त्यांच्या दरात प्रचंड तफावत आहे. तसेच सिडको केवळ हा परिसर संपादीत करून येथे अद्ययावत ले-आऊट उभारून देणार आहे. नियोजित शहर कसे असावे याचा आराखडा ते आखून देणार असून, गृहप्रकल्प उभारणी बाबत त्यांनी अद्याप कुठलाच निर्णय घेतलेला नाही. त्यातच आता पुन्हा खरपूडी येथे हा प्रकल्प फिजिबल नसल्याचा मुद्दा पुढे करून एका खाजगी कंपनीकडून या भागाचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले असून, सिडकोने हा प्रकल्प याच भागात होणार की, दुसरीकडे जाणार हे स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.दानवे, गोरंट्याल आणि खोतकरांचा निर्णयआजघडीला आता राज्यात सत्तांतर झाले आहे. त्यामुळे युती सरकारने घेतलेले निर्णय धडाधड रद्द करण्याचे काम नवीन सरकारने हाती घेतले आहे. त्यामुळे केंद्रात राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवेंसह आता या प्रकल्पाचे भवितव्य हे खºया अर्थाने आ. कैलास गोरंट्याल आणि माजी राज्यमंत्री तथा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :cidcoसिडकोMigrationस्थलांतरणArjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवे