शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाºयास कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:02 IST

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद व परिसरातील अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बडवे यांना गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याचा लेखी खुलासा २४ तासांत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दिलेल्या मुदतीत खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देअवैध वाळू उपसा : २४ तासांत खुलासा न आल्यास शिस्तभंगाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद व परिसरातील अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बडवे यांना गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याचा लेखी खुलासा २४ तासांत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दिलेल्या मुदतीत खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भोकरदन तालुक्यातील गिरजा व पूर्णा नदीतून अवैध वाळू उत्खनन, वाहतूक व चोरी होते. हसनाबाद पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या लतिफपूर, खडकी, बोरगाव खडक, सिरजगाव वाघ्रुळ, टाकळी बाजड, बोरगाव तारु, देऊळगाव ताड, केदारखेडा, गव्हाणा संगमेश्वर, जवखेडा, ठोंबरी, वालसा खालसा, नळणी बु., तडेगाव, कोपर्डा व बेलोरा या गावांतील रस्त्यावरुन याची वाहतूक होते.अवैध वाळू प्रतिबंधक पथकासाठी संरक्षण न देणे, हत्यारी पोलीस संरक्षण देण्यासाठी बºयाचदा तहसील कार्यालयाच्या अवैध वाळू प्रतिबंधक पथकाला पोलीस स्टेशनला ताटकळत ठेवणे, टाळाटाळ करुन मनुष्यबळ कमी आहे, जास्त आरोपी आहेत, कर्मचारी जेवायला गेले आहेत, दुसºया चौकीवर (राजूर) येथे आहेत, अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देणे, वाहनावर कार्यवाही केल्यानंतर दूरध्वनीद्वारे संपर्क केल्यास पोलीस उपस्थित राहत नाहीत.वाळूमाफियांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यास कर्मचाºयांना दमदाटी करतात. तसेच गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करतात. रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी कार्यवाही करत असताना संरक्षण देत नाहीत. रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी दूरध्वनी केल्यास आपण बाहेर असल्याचे सांगून वाळुमाफियांच्या वाहतूक करणाºया गाड्या स्वत:च्या वाहनासमोर घेऊन पास करुन देत असल्याचा ठपका सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी कोणतेही पोलीस संरक्षण व सहकार्य मिळत नाही. उलट वाळूमाफीयांना मदत करत असल्याचे दिसुन येत असल्याने बिडवे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच २४ तासांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जोंधळे यांनी दिले आहेत. मुदतीत खुलासा न मिळाल्यास व समाधानकारक नसल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे नोटिशीत नमूद आहे.