शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
3
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
4
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
5
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
6
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
7
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
8
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
9
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
10
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
11
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
12
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
13
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
14
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
15
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
16
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
17
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
18
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
19
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
20
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडचा शोएब खान बनला ‘मराठवाडा श्री ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:22 IST

एक शाम शहिदो के नाम या ब्रिद वाक्यावर आधारित लब्बेक ग्रुपच्या वतीने स्व. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या मराठवाडा श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत नांदेडच्या शोएब खान याने बाजी मारली

जालना: एक शाम शहिदो के नाम या ब्रिद वाक्यावर आधारित लब्बेक ग्रुपच्या वतीने स्व. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या मराठवाडा श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत नांदेडच्या शोएब खान याने बाजी मारली. औरंगाबाद व जालन्याच्या शरीरसौष्ठव पटुंनीही स्पर्धेत आपले कौशल्य दाखवले. विजेत्या स्पर्धकांनी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या स्पर्धेचे उदघाटन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते झाले. आ. राजेश टोपे, आ. इम्तीयाज जलील, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, डॉ. निसार देशमुख, भास्कर अंबेकर, अब्दुल रशिद , अब्दुल हाफीज, आबा ताकवले, डॉ. बद्रोद्दीन, एकबाल पाशा, शाहआलम खान, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, विनोद रत्नपारखे, जयंत भोसले, आरेफ खान, अफरोज पठाण, इसा खान, सिध्दीविनायक मुळे, डॉ. प्रताप जाधव आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.खोतकर म्हणाले, की शरीरास पिळदार बनविणे ही सोपी गोष्ट नाही. युवकांना पिळदार शरीरयष्टी तयार करण्यासाठी प्रोत्साहन देऊन लब्बेक गु्रपने शहरात एक नवी चळवळ चार वषार्पासून उभी केली आहे. हजारो तरुण यामुळे संघटीत होत असून, ही चांगली बाब असल्याचे त्यांनी सांगितले. आ. राजेश टोपे, आ. इम्तीयाज जलील यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात माजेद शेख यांनी स्पर्धेच्या आयोजनाची भूमिका सांगितली.यावेळी मि. वर्ल्ड राहिलेल्या महेंद्र चव्हाण यांनी प्रात्यक्षिके सादर केली. हेद्राबाद येथील विनोदी कलावंत अकबर बिन तवार यांनी आपल्या कलेतून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. अशफाक पठाण, प्रा. शारेख बिलाल यांनी केले तर शेख जाहेद यांनी आभार मानले. यावेळी डॉ. बद्रोद्दीन, एकबाल पाशा, डॉ. प्रताप जाधव, हसन पहेलवान, शेख अख्तर, अ‍ॅड. सय्यद अमजद ,फ ारुख बु-हान, शेख साजेद , शेख जावेद , अमिन हमदुले, जमील खान, सादिक खान मुस्तफा पटेल , अब्दुल समी, परवेज जागीरदार आदींची उपस्थिती होती.----------सात गटात झालेल्या या स्पधेर्चा निकाल पुढील प्रमाणे: मानाचा लब्बेक मराठवाडा श्रीचा मानकरी नांदेड येथील शोएब खान हा ठरला त्यास एकवीस हजार रु. रोख, प्रमाणपत्र , स्मृतीचिन्ह देऊन गोरविण्यात आले. ० ते ५५ गट: प्रथम मो. अय्याज नांदेड ,व्दितीय बाबासाहेब राठोड , तृतीय मोसीन गुलाम ओरंगाबाद , ५६ते ६० गट प्रथम अब्दुल रहेमान नांदेड , द्वितीय आसेफ बेग ओरंगाबाद तृतीय दुर्गाप्रसाद , चतुर्थ मयुर मेघावाले जालना , पाचवा शेख साजेद जालना ६१ते ६५ गट अक्षय भारजवाल जालना, करणसिंग नांदेड , मोहमद्द आमेर नांदेड, सलिम बाकोदा ओरंगाबाद शेख मोईन जालना , ६६ते ७० गट शोएब खान नांदेड , अभिमन्यू वानखेडे नांदेड , अजरोद्दीन फारुकी ओरंगाबाद , विशाल कागरा ओरंगाबाद, सय्यद सलिम जालना, ७१ ते ७५ गट पठाण आमेर ओरंगाबाद, डॉ. खान मो. बीड, अखिल खान जालना , हसन अब्बास व शेख अजिम ओरंगाबाद , ७६ ते ८० मो. जईद ओरंगाबाद , योगेश ठाकुर ओरंगाबाद , शेख शब्बीर व संतोष सुपारकर जालना, आसेफ खान औरंगाबाद, ८१ ते खुला गट वैभव मरकंटेवार नांदेड, शेख सोहेल बीड, नितीन दोडके जालना, इस्माईल सिद्दीकी ओरंगाबाद , कलीम बागवान जालना हे विजयी ठरले. बेस्ट मस्कुलर म्हणून अक्षय भारजवाल, बेस्ट पोजर वैभव मरकंटैवार, बेस्ट इम्प्रुमेंट अमिर पठाण हे चमकले.