शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या वाघाचा बनला कासव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:26 IST

शिवसेना बुजगावणी झाली असून, सेनेच्या वाघाचा आता कासव बनला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

जाफराबाद/घनसावंगी : शिवसेना बुजगावणी झाली असून, सेनेच्या वाघाचा आता कासव बनला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. जाफराबाद व घनसावंगी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आयोजित हल्लाबोल मोर्चात ते बोलत होते. या वेळी त्यांनी सरकारच्या धोरणावर चौफेर टीका केली.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दुपारी हल्लाबोल मोर्चास सुरुवात झाली. या वेळी महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खा. माजिद मेमन, जयंत पाटील, आ. राजेश टोपे, माजी आ. चंद्रकांत दानवे, राजेंद्र शिंगणे, माजी खा. कुंडलिक दानवे, कदीर मौलाना, विजय साळवे, डॉ. निसार देशमुख, महिला अध्यक्षा सुरेखा लहाने, रंगनाथ काळे, सुधाकर दानवे, राजेश चव्हाण, लक्ष्मण ठोंबरे, केशव जंजाळ, दीपक पाटील, सऊद शेख यांची उपस्थिती होती.अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील हे सरकार शेतकरी हिताचे नाही. या काळात १५ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील १ कोटी ३० लाख शेतक-यांपैकी फक्त ८९ लाख शेतक-यांचे कर्ज माफी झाल्याची फसवी घोषणा शासन करीत आहे. आजपर्यंत शेतक-यांच्या खात्यात काहीच रक्कम जमा झाली नाही. किती कर्ज माफी झाले याची माहिती सरकार जाहीर करत नाही. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे शेतकºयांच्या कमरेखाली गोळ्या घालण्याची भाषा करतात. न्यायाधीशांना सुद्धा जनतेसमोर यावे लागत आहे. विकासाची भाषा करणारे उलट वाळू माफियांना पाठीशी घालत आहेत, अशी चौफेर टीका पवार यांनी केली.आ. टोपे म्हणाले की, भाजप नेते खोटे बोलण्यात पटाईत आहेत. राज्यात जातीय राजकारण केले जात आहे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत.माजी आ. दानवे यांनी जाफराबाद तालुक्यातील शेतकºयांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून लिफ्ट इरिगिशनद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे, ऊस गाळपाचा प्रश्न सोडावा, असे सांगून सरकारवर टीका केली. या वेळी तहसीलदार जे. डी. वळवी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.या वेळी तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण, कौसर शेख, संतुकराव उबाळे, रामधन कळंबे, कपिल आकात, दत्तू पंडित, वामन दांडगे, कैलास दिवटे, मुजीब शेख, बंटी औटी, नंदकुमार गि-हे, मनीषा जंजाळ, सुनीता सावंत, नईम कादरी, रविराज जैस्वाल, शेख बाबू, राजेश म्हस्के, गजू लोखंडे, फैसल चाऊस यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. घनसावंगी येथेही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.आयजीच्या जिवावर बायजी..बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. असे असताना निकृष्ट बियाणे देणा-या कंपन्यांकडून पैसे घेऊन सरकार शेतक-यांना मदत देणार आहे. वा रे सरकार, आयजीच्या जिवावर बायजी उदार, असा हा प्रकार असल्याची खोचक टीका पवार यांनी केली. राज्यातील शेतक-यांवर जेव्हा संकटे आली, तेव्हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. परंतु आताच्या सरकारने आश्वासनांपलीकडे काहीच दिले नसल्याचे ते म्हणाले.-------------------...तर हिंमत झाली असती का?घनसावंगी : ‘कमळाबाई’ शिवसेनेचे आमदार फोडण्याची घोषणा करत आहेत. यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये आले कोठून, बाळासाहेब असते तर हिमंत झाली असती का, असा सवाल अजित पवार यांनी घनसावंगी येथे बोलताना उपस्थित केला. पैशाच्या जोरावर भाजप लोकशाहीचा गळा घोटत असल्याचे ते म्हणाले.------------पायाखालची वाळू सरकली-मुंडेमराठवाड्यात हल्लाबोल आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे विधान परिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. सरकारच्या विविध धोरणांवर त्यांनी टीका केली.