कायदेशीर सल्लागारपदी संदीप देशपांडे
जालना : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली. जालना येथे झालेल्या एका बैठकीत मुख्याध्यापक आघाडीचे राज्याध्यक्ष पी.यू. अरसूड व राज्याध्यक्ष अरुण जाधव यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या बैठकीमध्ये सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या निवडीचे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुण जाधव, पी.यू.अरसूड, विलास इंगळे, पी.डी. चव्हाण, परमेश्वर साळवे, लाजरस अल्हाट, शांतीलाल खरात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो
प्रा. जगन्नाथ रासवे यांची अध्यक्षपदी निवड
आष्टी : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य जगन्नाथ रासवे यांची निवड करण्यात आली. जालना येथे रविवारी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या निवडीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
---------------
फोटो
युगंधर प्रतिष्ठानची रुग्णाला आर्थिक मदत
टेंभुर्णी : येथील सेवाभावी संस्था युगंधर प्रतिष्ठानच्या वतीने एका रुग्णाला आर्थिक मदत करण्यात आली आहे. भोकरदन तालुक्यातील तांदुळवाडी येथील दिगंबर भुजंगराव पाटील हा युवक बीएस्सीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असून, त्याला सांधेवाताचा आजार आहे. त्याला स्काफो कंपनीचे महागडे इंजेक्शन दर महिन्याला द्यावे लागते. दिगंबरच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून, उपचारासाठी त्यांनी स्वत:ची दीड एकर जमीनदेखील विक्रीसाठी काढली आहे. सदर उपचाराचा खर्च कोणत्याही शासकीय योजनेत बसत नसल्याने ते हतबल झाले होते. दिगंबरच्या इंजेक्शनच्या खर्चासाठी हातभार लावावा म्हणून युगंधर प्रतिष्ठानने मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनातून संकलित झालेले २० हजार रुपये भुजंगराव पाटील यांच्याकडे सोमवारी देण्यात आले. यावेळी युगंधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद कळंबे, उपाध्यक्ष अल्ताफ शेख, सचिव धनंजय मुळे, सुधाकर चिंधोटे, संजय फलटणकर, भगवान चव्हाण, सतीश चंदनशिवें, मधुकर गोफणे, ज्ञानेश चव्हाण, शंकर शेळके आदींंची उपस्थिती होती.
--------