शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सीडपार्कच्या जमिनीचे मोजमाप पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:36 IST

पानशेंद्रा शिवारातील सीडपार्कसाठी संपादित करण्यात आलेल्या गट क्रमांक नऊमधील जमिनीचे मोजमाप मंगळवारी स्थानिक नागरिकांनी बंद पाडले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पानशेंद्रा शिवारातील सीडपार्कसाठी संपादित करण्यात आलेल्या गट क्रमांक नऊमधील जमिनीचे मोजमाप मंगळवारी स्थानिक नागरिकांनी बंद पाडले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.जालना येथे पानशेंद्रा शिवारात होत असलेल्या सीडपार्कसाठी महसूल प्रशासनाने तीस हेक्टर शासकीय गायरान जमीन संपादित केली आहे. या जमिनीेचे मोजमाप करून ती औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. मात्र ही गायरान जमीन शासनाने कसणा-यांच्या नावाने नियमित केल्याचे काही स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. बहुतांश ठिकाणी जमिनीवर शेती करण्यात येत आहे. महसूल प्रशासनाने मोजमाप केलेल्या जमिनीवर खुणा रोवून, सर्व बाजंूनी चारी खोदण्याचे काम मंगळवारी सुरू करण्यात आले. मंगळवारी दुपारी तहसीलदार विपिन पाटील हे पथकासह या ठिकाणी पोहोचले. मात्र, काही नागरिकांसह महिलांनी ही गायरान जमीन आमच्या नावाने असल्याचे सांगत चारी खोदण्याचे काम बंद पाडले. अधिका-यांनी स्थानिकांना कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना केल्या. मात्र, स्थानिकांकडे कागदपत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे तहसीलदार पाटील यांनी मोजणी अधिका-यांना स्थानिकांची कागदपत्रे तपासून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे चारी खोदण्याचे काम थांबविण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.