शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वाकुळणीत सतार व पखवाजाची जुगलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:37 IST

युरोपमधील बेल्जीयम येथून आलेले जगविख्यात सतारवादक बर्ट कार्नेलिस आणि महाराष्ट्रातील नामांकित पखवाज् ावादक पं़ उध्दवबापू आपेगावकर यांच्यात जुगलबंदी रंगली. निमित्त होते वाकुळणी येथील संगीत महोत्सवाचे.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : युरोपमधील बेल्जीयम येथून आलेले जगविख्यात सतारवादक बर्ट कार्नेलिस आणि महाराष्ट्रातील नामांकित पखवाज् ावादक पं़ उध्दवबापू आपेगावकर यांच्यात जुगलबंदी रंगली. निमित्त होते वाकुळणी येथील संगीत महोत्सवाचे.तालुक्यातील वाकुळणी येथे संत वाङमय सेवा संघाच्या वतीने सोमवारी या दोन्ही जखविख्यात कलाकारांच्या उपस्थितीत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते़ या महोत्सवाचे उद्घाटक मानव विकासचे आयुक्त भास्कर मुंडे हे होते. अध्यक्षस्थान हभप पंढरीनाथ महाराज तावरे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. कल्याण काळे, पखवाज वादक हभप दादा महाराज पाटील, हभप शिवाजी महाराज शिंदे, हभप कृष्णा महाराज काकडे, हभप राम शेळके आदी उपस्थित होते़ यावेळी बर्ट कार्नेलिस व पं़उध्दवबापू आपेगावकर यांची जुगलबंदी सुमारे अडीच तास रंगली़ या जुगलबंदीची सुरुवात पुरीया धनाश्री या रागाने करण्यात आली. नंतर यमन, मुल्तानी व शेवटी भैरवी असे विविध राग बर्ट कार्नेलिस यांनी सतारीवर वाजविले. शेवटी रघुपती राघव राजाराम ही धून वाजवून श्रोत्यांची मने जिंकली.यावेळी त्यांना पं उध्दवबापू आपेगावकर यांनी पखवाजाची उत्तम साथ मिळाली़ या दोन्ही कलाकारांचे एकसोबत असे कार्यक्रम अनेक देशविदेशात होतात. आज मात्र वाकुळणीत ही जुगलबंदी झाली. यावेळी सतारवादक बर्ट कार्नेलिस म्हणाले की, मला या संगीत श्रोत्यांमध्येच देव दिसतो. संगीतातून त्यांना सतत भेटत असतो़ हभप पंढरीनाथ तावरे महाराज म्हणाले की, या कार्यक्रमामुळे येथील पखवाज वादक विद्यार्थ्यांना व वारकरी सांप्रदायाला सतार व पखवाजाची साथ अनुभवता आली. विद्यार्थ्यांना पखवाजाचे बोल,बारकावे शिकायला मिळाले. या दोन्ही कलाकारांनी हा कार्यक्रम कै. शंकरबापू आपेगावकर व गुरूवर्य कै. भानुदास अटाळकर यांना गुरूदक्षिणा म्हणून समर्पित केला.