नेतेही उतरले रिंगणात : उमेदवारांचा प्रचार फेऱ्यांवर जोर
लोकमत न्यूज नेटवर्क
सातोना (खु) : परतूर तालुक्यातील सातोना (खु) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांवर जोर दिला आहे. या ग्रामपंचायतीच्या १५ जागांसाठी गावातील प्रमुख दोन पॅनेलचे ३० उमेदवार रिंगणात आहेत. ही लढत दोन पॅनेलमध्ये अटीतटीची होणार आहे.
परतूर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सातोना (खु) येथे उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांवर जोर दिला आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे गावातील एका आकात गटाकडून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी आपला गड राखण्यासाठी कस पणाला लावला आहे. सातोना (खु) येथे एकूण तीन पॅनेलचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. परंतु, यातील एक पॅनेल सर्व प्रभागांमध्ये आपले उमेदवार उभे करण्यास असमर्थ ठरले आहे. आता याचा फायदा नेमका कोणत्या पॅनेलला होतो, हे सांगणे कठीण आहे.
फोटो ओळ : सातोना (खु) येथे प्रचार फेºयांना वेग आला आहे. उमेदवारांसह नेते गल्ली- बोळांमध्ये जाऊन मतदारांमध्ये जागृती करीत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा अध्यक्ष कपिल आकात, माजी सरपंच महेश आकात, आसाराम लाटे, मुंजा वाहुळ आदी.