तीर्थपुरी : धकाधकीच्या आयुष्यात समाधानी असणं हे लोक विसरून गेले आहेत. आपल्याजवळ जे आहे त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे काय नाही. ते मिळविण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे. अपेक्षा करणं आणि ते मिळविण्यासाठी धडपड करणं चुकीचं नाही. परंतु, समाधानी असणं हीच आयुष्याची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रमोद महाराज कुमावत यांनी केले.
अंबड तालुक्यातील खेडगाव येथे आयाेजित कीर्तन कार्यक्रमात प्रमोद महाराज कुमावत यांनी ‘हेचि थोर भक्ति आवडते देवा संकल्पावी माया संसाराची।। ठेविले अनंते तैसेचि रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।।’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत उपस्थितांचे प्रबोधन केले. आपल्याजवळ जे आहे त्याचा विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपण किती भाग्यवान आहोत हे शरीराने अपंगत्व असलेल्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. आयुष्यात नेहमी समाधानी राहायला शिका. अपेक्षा जरुर ठेवा पण त्याच ओझं होऊन परिस्थिती बिघडण्याच्या अगोदर त्यावर नियंत्रण ठेवा असेही ते म्हणाले. यावेळी काकासाहेब शिंनगारे, राजेंद्र गोडसे, प्रा. डॉ. सुनील खांडेभराड, भाऊसाहेब गोडसे, अर्जुन महाराज गोडसे, सुरेश खांडेभराड, नरहरी शिंनगारे, दादाराव गोडसे, पंढरी शिनगारे, भागवत खांडेभराड, प्रा. संतोष पठाडे, गणेश गोडसे, अमोल गोडसे, हरी गोडसे, अमोल खांडेभराड, रामेश्वर गोडसे, कचरू गोडसे, नारायण गोडसे, बाळू गोडसे, शंकर गोडसे, ज्ञानेश्वर गोडसे, संभाजी गोडसे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
फोटो