शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करी करणारे पाच ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:31 IST

गोंदी पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी सकाळी गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे पाच ट्रॅक्टर ताब्यात घेतले.

शहागड : गोंदी पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी सकाळी गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे पाच ट्रॅक्टर ताब्यात घेतले.शहागड-वाळकेश्वर या दोन गावातील अवैध वाळू तस्करी बंद करण्यात महसूलच्या पथकाला यश आले असले तरी, गोरी-गंधारी, डोमलगाव, आपेगाव, कुरण, गोंदी, जोगलादेवी या गावांमधील अवैधवाळू तस्करांचा गोंगाट अजूनही कायम आहे. आठ दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जोगलादेवी नदीच्या पात्रातील अवैधवाळू तस्करांविरूध्द कारवाई करत ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. शनिवारी सकाळी कुरण गोदापात्रात पंधरा ट्रॅक्टर अवैध वाळू तस्करी करत असल्याची माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे सपोनि मच्छिंद्र सुरवसे यांना मिळाली होती. शनिवारी सकाळी आठला कुरणला पाच ट्रॅक्टर गोंदी पोलिसांनी पकडले तर आठ-दहा ट्रॅक्टर पळून गेले.-----------अधिका-यांमध्ये शाब्दिक चकमकगोंदी पोलीस ठाण्याचे सपोनि मच्छिंद्र सुरवसे यांनी अचानक कूरण परिसरातील अवैध वाळू तस्करी करणारे टॅक्टर पकडल्यानंतर तलाठी अभिजित देशमुख गोंदी पोलीस ठाण्यात गेले. दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तलाठी अभिजित देशमुख यांनी घडला प्रकार तहसीलदार दत्ता भारस्कर यांना सांगितला.---------नळणी शिवारातही कारवाईभोकरदन : नळणी येथून अवैध वाळू वाहतूक वाहतुक करणारा एक हायवा व एक ट्रॅक्टर भोकरदन पोलिसांनी शनिवारी पकउला. या प्रकरणी वाहन चालक व मालकाविरूध्द गुन्हा दाखल करून तब्बल १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी रात्री भोकरदन पोलिसांनी नळणी शिवारात ही कारवाई केली. चालक संतोष देविदास ठोंबरे (रा.जवखेडा ठोंबरे) व मालक गजानन सर्जेराव ठोंबरे, अशी गुन्हा दाखल दोघांची नावे आहेत. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सांखळे तपास करीत आहेत.