शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

लाखाच्या दुचाकीची दहा हजारांत विक्री; गुन्हे शाखेने दोघांना घेतले ताब्यात, तब्बल २६ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 19:02 IST

crime in Jalana दुचाकीचोरांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक तपास करीत होते.

जालना : जालना शहरासह औरंगाबाद, नाशिक व इतर जिल्ह्यांतून चोरलेल्या लाखोंच्या दुचाकी दहा ते वीस हजारांमध्ये विक्री करणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी जेरबंद केले. त्याच्याकडून एक दोन नव्हे तब्बल २६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

रामधन स्वरूपचंद बालोद (रा. शिंदेबनवाडी, ता. भोकरदन), पवन प्रताप इंगळे (रा. पळसखेडा पिंपळे, ता.भोकरदन) अशी ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीचोरांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक तपास करीत होते. या पथकाला पळसखेडा पिंपळे येथील रामधन बालोद याचा दुचाकी चोरीत हात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने बालोद याला ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखविताच बालोद याने दुचाकीचोरीची माहिती दिली. तसेच त्याचा सहकारी पवन प्रताप पिंपळे याच्यासह इतर साथीदारांच्या मदतीने दुचाकींचे हॅण्डल लॉक तोडून त्यांची चोरी करीत असल्याचे सांगितले. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी भोकरदन तालुका व परिसरातून तब्बल २६ दुचाकी जप्त केल्या आहेत. संबंधितांनी जालना, औरंगाबाद, नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून दुचाकींची चोरी केल्याचे समोर आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग, पोउपनि दुर्गेश राजपूत, प्रमोद बोंडले, हवालदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सुधीर वाघमारे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, जगदीश बावणे, रवी जाधव यांच्या पथकाने केली.

कागदपत्रांचा पत्ता नाहीचोरलेल्या दुचाकीसंबंधित संशयित गरजू व्यक्तींना दहा ते वीस हजार रुपयांमध्ये विक्री करीत होते. विशेषत: त्यांच्याजवळचे काही लोक या भामट्यांच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जुन्या दुचाकी खरेदी करताना कागदपत्रांची पडताळणी करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी केले आहे.

१७ गुन्ह्यांचा उलगडागुन्हे शाखेने केलेल्या चौकशीमध्ये तब्बल १७ दुचाकीचोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातील ९ आणि इतर जिल्ह्यातील ८ अशा एकूण १७ गुन्ह्यांचा समावेश आहे. इतर दुचाकींच्या चोरीचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना