शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस प्रशिक्षण केंद्रातील महिलेकडून मुलीची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:45 IST

जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका शिपाई महिलेने अल्पवयीन मुलीची राजस्थानमध्ये अडीच लाखांत विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी राधिका छत्तरसिंग हिवाळे (रा. बांधकाम विभाग क्वॉर्टर्स) हिच्यासह सुजितकुमार मोतीलाल लोहार (रा.वृषभदेव. जि. उदयपूर, राजस्थान) याला अटक केली आहे.

ठळक मुद्देराजस्थानमध्ये अडीच लाखांत सौदा ; दोघांना अटक

जालना : येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका शिपाई महिलेने अल्पवयीन मुलीची राजस्थानमध्ये अडीच लाखांत विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी राधिका छत्तरसिंग हिवाळे (रा. बांधकाम विभाग क्वॉर्टर्स) हिच्यासह सुजितकुमार मोतीलाल लोहार (रा.वृषभदेव. जि. उदयपूर, राजस्थान) याला अटक केली आहे.  पोलीस सूत्रांनी सांगितले,  पोलीस प्रशिक्षण केंद्रात काम करणाºया राधिका छत्तरसिंग हिवाळे हिच्याकडे पिडीत मुलगी कामानिमित्त येत असे.  राधिकाने आठवडाभरापूर्वी या मुलीस विक्री करण्याच्या उद्देशाने फूस लावून पळविले. तिने सुरुवातीला पीडित मुलीला औरंगाबाद येथील एका व्यक्तीस दाखविले. मात्र, पसंत नसल्याचे सांगत त्या व्यक्तीने नकार दिला. त्यानंतर ती पीडितेला पुण्यातील एका व्यक्तीकडे घेऊन गेली. मात्र, आर्थिक देवाण-घेवाणीतून तोही सौदा फिस्कटला. एवढ्यावर न थांबता राधिकाने ओळखीच्या व्यक्तीच्या मध्यस्थीने पीडितेस थेट राजस्थानमधील सुजितकुमार मोतीलाल लोहार यास अडीच लाखांत विकले. सुजितकुमारने वारंवार अत्याचार केल्याचे पीडितेने जबाबात म्हटले आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बाजार पोलिसांच्या पथकाने औरंगाबाद, पुणे, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये जाऊन अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. सुजितकुमार मोतीलाल लोहार यास शुक्रवारी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला वडिलांच्या स्वाधीन केले. त्यानंतर या महिलेलाही अटक केली. दोघांनाही रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, यशवंत जाधव, उपनिरीक्षक सुधीर त्रिनेत्रे, अर्जुन पवार, संदीप बेराड, अंबादास दांडगे, ज्योती राठोड यांनी ही कारवाई केली.मुली विकणारे रॅकेट?अशा प्रकारे मुलींची विक्री करणारे रॅकेट असण्याची शक्यता असून, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी व्यक्त केली. पोलिसांनी आठवडाभरात २२०० किलोमीटरचा प्रवास करत पीडितेची सुटका करून आरोपींना अटक केल्याचे त्यांनी सांगितले.राधिकावरच होता संशय !पोलीस प्रशिक्षण केंद्रातील शिपाई  राधिका छत्तरसिंग हिवाळे हिच्याकडे पीडित अल्पवयीन मुलगी कामाला असल्याने तक्रार करताना वडिलांनी राधिकावरच संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीलाच राधिकाला ताब्यात घेऊन चौकशीही केली होती. शुक्रवारी मुलीने जबाबात सर्व हकीकत सांगितल्यानंतर पोलिसांनी शनिवारी तिला अटक केली.