शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

साहेब... आमच्या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याकडं बी बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:40 IST

दुष्काळात पाणी आणण्यासाठी शिवसेनेने जसे चांगले प्रयत्न केले, त्यामुळे तर आम्ही समाधानी झालो आहोतच, परंतु आता आमच्या शाळेत जाणा-या रस्त्याचे डांबरीकरण करा अशी आर्त हाक दहीफळ-काळे येथील विद्यार्थिंनीनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना घातली.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळात पाणी आणण्यासाठी शिवसेनेने जसे चांगले प्रयत्न केले, त्यामुळे तर आम्ही समाधानी झालो आहोतच, परंतु आता आमच्या शाळेत जाणा-या रस्त्याचे डांबरीकरण करा अशी आर्त हाक दहीफळ-काळे येथील विद्यार्थिंनीनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना घातली.खोतकर तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर हे आज जलपूजना निमित्त जालना तालुक्यातील दहीफळ येथे आले असतांना विद्यार्थिंनी तसेच त्यांच्या पालकांनी खोतकर यांना जलपूजनाच्या कार्यक्रम प्रसंगी ही मागणी केली.शिवसेनेकडून दुष्काळाचा महामुकबला अंतर्गत मानेगाव जहागीर, दहीफळ तसेच परिसरातील अन्य गावांमध्ये जालन्यातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने नवीन बोअरवेल घेणे, आहे त्या हातपंपावर विद्युत मोटार बसविणे, प्लास्टिकच्या टाक्यांचे वाटप करून मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे.ही कामे पूर्ण झाल्यावर त्यांच्या लोकापण सोहळ्यासाठी गुरूवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, उपजिल्हा प्रमुख पंडित भुतेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आज वरील गांवाचा दौरा केला.शिक्षणासाठी मोतीगव्हाणला पायपीटदहिफळ काळे येथील जलपूजनाच्या कार्यक्रमात सुषमा काळे, ऋतुजा काळे, निमाली काळे, श्रध्दा काळे, जयश्री काळे यांच्यासह या गावातील महिलांनी खोतकरांची भेट घेतली. येथील मुलींना शालेय शिक्षणासाठी मोतीगव्हाण येथे जावे लागते.पावसाळ्यात हा तीन किलो मीटरचा रस्ता पूर्ण चिखलमय होतो. त्यामुळे शाळेत जाणे कठीण होऊन बसते. तसेच शाळेत जाण्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था नसल्याने चार महिने आमच्यासाठी मोठे जिकिरीचे ठरतात असे नमूद केले.यावेळी हा रस्ता चांगला करून देण्यासह बस सोडता आली तर त्याकडेही लक्ष द्यावे अशी विनंती खोतकरांना केली. आपण यात निश्चित लक्ष घालून तो रस्ताही चांगला करून देऊ असे खोतकरांनी सांगितले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागArjun Khotkarअर्जुन खोतकर