शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मंठा येथे बीडीओंच्या कार्यालयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:28 IST

मंठा येथील गटविकास अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी तोडफोड केली.या प्रकारामुळे गटविकास अधिकारी कार्यालयात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

जालना : मंठा येथील गटविकास अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी तोडफोड केली.या प्रकारामुळे गटविकास अधिकारी कार्यालयात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.मंठा तालुक्यात यावर्षी मुबलक पाऊस झालेला नाही. यामुळे अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनेचे जिल्हाध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी दहा दिवसांपूर्वी गटविकास अधिका-यांना निवेदन देऊन तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्याची मागणी केली होती. मात्र, संबंधित अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले. पाणी टंचाई निवारणार्थ कुठल्याही उपाय योजना केल्या नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी गटविकास अधिका-यांच्या कार्यालयात टेबलवरील काच फोडली. तसेच टेबल, खुर्च्यांचे नुकसान केले. कार्यालयीन वेळेत येथे अधिकारी उपस्थित राहत नसल्यामुळेही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.या प्रकरणी पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी शिवाजी कोरडे यांनी मंठा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर काकडे, महादेव काकडे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख आलमगिर तपास करीत आहेत.