शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रुफ टॉप बसवा; वीज वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:03 IST

वीजेचे वाढणारे दर, पुरेशी उपलब्धता नसणे या पार्श्वभूमीवर आता शहरात सौर ऊजेर्चा वापर करून घराच्या छतांवर वीजनिर्मिती केली जात आहे.

बाबासाहेब म्हस्के।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीजेचे वाढणारे दर, पुरेशी उपलब्धता नसणे या पार्श्वभूमीवर आता शहरात सौर ऊजेर्चा वापर करून घराच्या छतांवर वीजनिर्मिती केली जात आहे. शहरातील मोठी रुग्णालये, वित्तीय संस्था, कार्यालयांच्या छतावर रुफ टॉप बसवून विजेची गरज भागविण्याला प्राधान्य दिले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही सौरउर्जेपासून तयार वीज वापरली जात आहे. सौर उर्जेच्या वापरातून वीजबिलात लाखो रुपयांची बचत होत आहे.विजेचा वाढता खर्च कमी करण्यासाठी नागरिक घरी सौर ऊर्जेवर पाणी तापवण्यासाठी सोलर वॉटर हिटरचा वापर करतात. त्यातून घरगुती गॅसची बचत होते. मात्र, प्रत्येकाने संपूर्ण घरासाठी सौर उर्जेपासून वीज निर्मितीकरून स्वयंपूर्ण व्हावे याबाबत शासनाकडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत. घराच्या छतावर घरगुती वापरासाठी सौलर पॅनलचा वापर वाढावा यासाठी राज्यशासनाने रूफ टॉप पॉलिसी सुरू केली आहे. यात सौर पॅनलचे दर कमी करण्यात आल्यामुळे ही योजना आता सर्वसामान्यांपर्यंत पोहचत आहे. याचा परिणाम म्हणजे शहरातील अनेक इमारतींवर रुफ टॉप बसविल्याचे दिसत आहे. विशेषत: मोठ्या रुग्णालये यास रुफ टॉप बसविण्यास प्राधान्य देत आहेत.जालना शहरात एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून रुफ टॉप सौलर पॅनल बसविण्याचे काम पाहणारे इलेक्ट्रिक इंजिनिअर सांप्रत चिपलकट्टी यांनी सांगितले, की रुफ टॉप पद्धतीमध्ये घरांवर सोलर पॅनल बसवले जातात. सूर्यप्रकाशापासून निर्माण होणारी वीज इर्न्व्हटरमध्ये साठवली जाते. त्याला नेट मीटर जोडले जाते. नेट मीटरमध्ये निर्माण होणारी वीज ग्राहकाने किती वापरली, तसेच अतिरिक्त ठरणारी वीज महावितरणाच्या ग्रीडला किती जोडली अशी नोंद घेण्याची सुविधा आहे. सूर्यकिरणे प्रखर असल्यास अधिक वीजनिर्मिती होते. गरजपेक्षा अधिक तयार झालेली वीज थेट महावितरणाच्या रोहित्राला अ‍ॅटो पद्धतीने पाठविण्याची सुविधा आहे.ग्राहक त्याला आवश्यक असलेली वीज वापरू शकतो. सकाळी अतिरिक्त निर्माण झालेली वीज साठवून ठेवण्यापेक्षा थेट महावितरणला विकता येते. ग्राहक स्वत: निर्मिती केलेली वीज जितकी वापरेल, तितका महावितरणचा भार कमी होतो. अतिरिक्त युनिट महावितरणला विकले तर ग्राहकाची रक्कम समायोजित केली जाते. खूपच अतिरिक्त वीज महावितरणला दिल्यास वर्षभराचा हिशेब करून ग्राहकाला त्या विजेचा मोबदलाही दिला जातो.सोलार : वाढत्या स्पर्धेमुळे किमतीत घटकाही वर्षांपर्यंत सौर ऊजेर्साठी लागणारे सोलर पॅनल खरेदी करणे खूप खर्चिक होते. आता त्यातील दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. एकदा पॅनल बसवल्यानंतर निर्माण होणारी वीज आणि सोलर पॅनलचे आयुष्य बघितले तर शून्य देखभाल खचार्मुळे ग्राहकांना ते परवडते. सौलररुफ टॉप बसविण्याचा खर्च तीन ते चार वर्षांत सहज निघू शकतो. सध्या सोलर पॅनलच्या वितरणात देश-विदेशातील कंपन्यांमुळे पॅनलचे दर स्पर्धात्मक झाले आहेत. साधारणत: एक किलो वॅट वीज निर्मितीच्या दृष्टीने विचार केला तर किमान ८५ हजार रुपये इतका खर्च येतो. सकाळी साडेदहा वाजेनंतर वीज निर्मितीला वेग येतो तोपर्यंत आठ ते नऊ टक्के वीजनिर्मिती होते. इन्व्हर्टरच्या माध्यमातून तयार वीज साठवून हवी तेंव्हा वापरता येवू शकते.

टॅग्स :electricityवीजgovernment schemeसरकारी योजना