शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

करमणूक केंद्र नावाखाली ‘लुटारू’ लॉटरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:50 IST

शहरातील विविध भागांत करमणूक केंद्राच्या नावाखाली अवैध आॅनलाईनचा लॉटरी व्यवसाय सर्रास सुरु असून, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, अशा प्रकारच्या जुगाराच्या आहारी जात असल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील विविध भागांत करमणूक केंद्राच्या नावाखाली अवैध आॅनलाईनचा लॉटरी व्यवसाय सर्रास सुरु असून, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, अशा प्रकारच्या जुगाराच्या आहारी जात असल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले. विशेष म्हणजे या लॉटरी चालविणा-यांकडे कुठलाही शासन परवाना नसतानाही हा व्यवसाय फोफावला आहे. याकडे जिल्हा प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.दर एका मिनिटाला आॅनलाईन पद्धतीने सोडत काढून १ रुपयास तब्बल ९० रुपये दिले जात असल्याने पैशांच्या आमिषाने तरुणाई याच्या आहारी जात आहे. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या आॅनलाईन लॉटरी व्यवसायात रॅकेट सक्रिय असून, साखळी पद्धतीने खुलेआम शहरात करमणूक केंद्राच्या नावाखाली आॅनलाईन लॉअरीचे दुकान मांडल्याचे आढळून आले. नवीन आणि जुना जालना अशा शहरातील विविध भागांत जवळपास ५० लॉटरी सेंटर्स आढळून आली. आॅनलाईन लॉटरी सेंटर्सधारकांकडून ग्राहकास दिल्या जाणा-या पावतीवर शासन परवाना वा मान्यतेचा उल्लेख नसल्याचे उघडकीस आले. याद्वारे एकप्रकारे शासनाचा कर चुकविला जात आहे. तर दुसरीकडे गोरगरीब जनतेना लुटण्याचा धंदाच खुलेआमपणे शहरात सुरु आहे. इयत्ता दहावी आणि बारावीत शिक्षण घेणारी मुलेही या लॉटरीच्या आहारी गेली आहेत.या लॉटरी सोडतीतून नव्वद पटीने पैशांचे आमिष दाखविले जात असल्याने गरीब जनता यात लुबाडली जात आहे. शहरात या व्यवसायाची जवळपास दीड ते दोन कोटींची उलाढाल असल्याचे एका लॉटरी व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतशी बोलताना सांगितले.या रॅकेटमध्ये शहरातील अनेक व्हाईट कॉलर असलेल्या व्यक्तींचाही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. आॅनलाइन आकड्यांच्या या खेळात अनेकांचे संसार बरबाद होत आहेत.या संदर्भात जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. सॉफ्टवेअर मुंबईतून जालन्यातमुंबईत आॅनलाईन लॉटरी सोडतीचे सॉफ्टवेअर बनविणारी टोळी सक्रिय आहे. येथूनच जालना वा इतर शहरांत ते टक्केवारीवर दिले जात आहे. ६० व ४० असे उत्पन्नाचे प्रमाण ठेवून या सॉफ्टवेअरद्वारे आॅनलाईन लॉटरीचा व्यवसाय खुलेआम केला जात आहे.४काही महिन्यांपूर्वीच गुन्हे शाखेच्या अहवालानंतर जालना शहरातील बहुतांश मटका बुकींना शहरातून हद्दपार करण्यात आले होते. यात मुख्य मटका बुकी कमलकिशोर बंगचाही समावेश आहे. अशीच कारवाई आॅनलान लॉटरी चालकावंर होणार का, हा प्रश्न आहे.