शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहरातील रस्ते पथदिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:13 IST

जालना : महावितरणची पालिकेकडेअसलेली बारा कोटींची थकबाकी नगराध्यक्षांचा पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश आले असून, तांत्रिक बाबीत अडकलेल्या या मुद्द््यावर तोडगा काढत महावितरणने सहा कोटी माफ केले. तर पालिकेने तात्काळ उर्वरित थकबाकी ४ कोटी २५ लाख रुपये भरले. गत आठ ते दहा वर्षांपासून सुरु असलेल्या या लढ्याला अखेर यश आल्याने जालनेकरांतून ...

जालना : महावितरणची पालिकेकडेअसलेली बारा कोटींची थकबाकी नगराध्यक्षांचा पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश आले असून, तांत्रिक बाबीत अडकलेल्या या मुद्द््यावर तोडगा काढत महावितरणने सहा कोटी माफ केले. तर पालिकेने तात्काळ उर्वरित थकबाकी ४ कोटी २५ लाख रुपये भरले. गत आठ ते दहा वर्षांपासून सुरु असलेल्या या लढ्याला अखेर यश आल्याने जालनेकरांतून समाधान व्यक्त केले जात आहे.शहरात सुमारे ३० हजार विद्युत खांब आणि हायमास्ट शहरातील विविध भागांत बसविण्यात आले आहेत. याच्या वीजबिलापोटी महावितरणतर्फे पालिकेकडे अव्वाच्या सव्वा बिल आकारले गेले. कोणतेही मीटर रीडिंग नसताना अंदाजे बिल आकारले गेल्याचा मुद्दा नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी जिल्हा प्रशासन आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिला. यानंतर पालिका प्रशासन आणि महावितरणचे अधिकारी यांच्या बैठका होऊन अनेक चर्चेच्या फे-या झडल्या. यातून वीजबील आकारणी चुकीची असल्याचा निष्कर्ष काढत ११ कोटी २५ लाखांपैकी तब्बल सहा कोटी रुपये माफ करण्यात आले. पालिकेला चार कोटी २५ लाखांची रक्कम भरुन वीज पुरवठा पूर्ववत करता येऊ शकेल, असे महावितरणने कळविले. त्यानंतर नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी थकबाकीची रक्कम भरण्याचे निर्देश मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना दिले. थकबाकी मंगळवारी भरण्यात आली. शहरातील विविध भागांत असलेले पथदिवे टप्प्याटप्प्याने सुरु होणार आहेत.सात ते आठ वर्षांपासून रखडलेला थकबाकीचा मुद्दा निकाली काढण्यात पालिका प्रशासनासह नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांना यश आले.यापुढे वीजबिला पोटी पालिकेला दरमहा तीन लाख रुपयांचे बिल येणार आहे. शहरातील विविध भागांतील अंधारात बुडालेले रस्ते दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघणार असल्याने जालनेकरांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagaradhyakshaनगराध्यक्ष