शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतरही तीन रस्त्यांची कामे अपूर्णच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:11 IST

वर्षभरानंतरही सहा पैकी तीन रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराच्या इतिहासात कधी नव्हे तो रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून आणण्यात आला. पालिकेतील कामे गुणवत्तेची होत नसल्याची ओरड होत असल्याने या रस्त्यांची काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आली. असे असले तरी वर्षभरानंतरही सहा पैकी तीन रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे चित्र आहे. काँक्रिटीकरणात गुणवत्तेचे तीन तेरा वाजले असून, सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनी संबंधित कंत्राटदाराकडून सदरील कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.जालना शहरात दर सहा महिन्यांनी एकाच रस्त्याचे डांबरीकरण केले जात असे. खड्डेयुक्त रस्त्यांमुळे जालना शहराचा ‘लौकिक’ सर्वदूर पोहोचला. हा लौकिक खºया अर्थाने सुधारण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी शहरातील सर्वच प्रमुख मार्गांचे काँक्रिटीकरण करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घालून विशेष बाब म्हणून तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी आणला. रस्त्यांची कामे सुरु होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयास हा निधी प्राप्त झाला होता.पालिकेकडून गुणवत्तेची कामे होत नसल्याचा नेहमीचा अनुभव असल्याने ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली. मात्र, या कामाच्या निमित्ताने या विभागाचाही अनुभव जालनेकरांना फारसा चांगला आलेला नाही.विशेष म्हणजे काँक्रिटीकरणाचा शुभारंभ शहरात दोन वेळा झाला. मामा चौकात ‘पक्षीय पातळीवर’ भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते काँक्रिटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते पुन्हा या रस्ते कामाचे उद्घाटन झाले.पण श्रेयवादाच्या या प्रयत्नात गुणवत्तेकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाºयांनीही या कामांची तपासणी केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या रस्त्यांच्या कामाबाबत थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी झाल्या. या कामांची सुरुवात होऊन वर्ष झाले आहे.तरीही जवळपास तीन रस्त्यांची कामे अद्याप अपूर्णच आहेत. ही कामे कधी पूर्ण होणार, असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाºयांना विचारण्याची गरज आहे.