अवैध प्रवासी वाहतूक
अंबड : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे. ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अपघात वाढले आहेत. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कारवाईची मागणी
भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे.
सर्वांनी मतदान करावे
देळेगव्हाण : जाफराबाद तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडित यांनी केले आहे.
रस्त्यावर काटेरी झुडपे
गोलापांगरी : बठाण खुर्द ते सारंगपूर फाटा या रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी काटेरी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत.