शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता, पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:00 IST

वारंवार मागणी करूनही मूलभूत प्रश्न सुटत नसल्याने जालना तालुक्यातील तालुक्यातील मौजपुरी येथील व बदनापूर तालुक्यातील देऊळगाव येथील मतदारांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना / मौजपुरी : वारंवार मागणी करूनही मूलभूत प्रश्न सुटत नसल्याने जालना तालुक्यातील तालुक्यातील मौजपुरी येथील व बदनापूर तालुक्यातील देऊळगाव येथील मतदारांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीच्या उत्सवातच मतदारांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्याने प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.जालना तालुक्यातील मौजपुरी येथील करुणा मोरे यांनी महिलांच्या वतीने प्रसिध्दीपत्रक काढले आहे. गावात लाखो रूपये खर्च करून विकास कामे झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आजही ग्रामस्थांना मूलभूत सोयी-सुविधांच्या प्रश्नाचा सामना करावा लागतो. गावातील धार्मिक स्थळावर डोकं टेकविण्यासाठी हजारो भाविक येतात. मात्र, त्यांच्यासाठी स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे.गावातील मूलभूत प्रश्न सोडविणे, जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करणे इ. विविध प्रश्न मांडले असून, हे प्रश्न वर्षानुवर्षापासून कायम आहेत. हे प्रश्न कोणत्याच राजकीय नेत्याने सोडविलेले नाहीत. त्यामुळे आम्ही मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकत असल्याचेही मोरे यांनी पत्रकात नमूद केले आहे.बदनापूर तालुक्यातील देऊळगाव येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. जालना- राजूर मार्गाचे काम झाले. मात्र, नाल्यांचे काम न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे अपघात होण्याचे प्रकार घडत असून, शाळकरी मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.मागासवर्गीय वस्तीत थंडी, ताप, मलेरिया, खोकला, डेंग्यू इ. आजार उद्भवले आहेत. या भागात गत दोन वर्षापासून नाल्यांच्या साफसफाईची कामे झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर रतनराज डोळसे, पूनम डोळसे, रोहिणी लोखंडे, गजानन अंकुशकर, यम्मन कातुरे, यशोदा माने, सुनील डोळसे, मिलिंद दाभाडे, संजय डोळसे, छगनराव वाघमारे, सिध्दार्थ पवार, रोहन डोळसे, सिध्दार्थ डोळसे यांच्यासह गावातील जवळपास ६२ ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळी कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.टंचाई : विहिरीतून आणावे लागते पाणीमान देऊळगाव येथे बारमाही पाणीटंचाई आहे. महिलांना विहिरीतून शेंदून पाणी आणावे लागते. यापूर्वी एका महिलेचा पाणी आणताना जीव गेला आहे. बाणेपांगरी आरोग्य उपकेंद्रात महिलांची गैरसोय होत आहे, यासह इतर अनेक समस्या ग्रामस्थांनी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या आहेत.आंदोलनाचा इशारादेऊळगाव येथील ग्रामस्थांनी मुलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय १८ आॅक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनjalna-acजालनाcivic issueनागरी समस्या