नंदापूर येथे अभिवादन
जालना : तालुक्यातील नंदापूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास युवक, महिलांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
आंब्याचा मोहर बहरला
अंबड : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या आंब्यांच्या झाडांना मोहर बहरला आहे. यंदा कलमी आंब्यांसह गावरान आंब्याचीही आवक होणार आहे. जर अवकाळीने हजेरी लावली नाही तर यातून शेतकऱ्यांनाही चांगले उत्पन्न मिळणार आहे.
हेलस येथे कार्यक्रम
मंठा : तालुक्यातील हेलस येथील जिल्हा परिषद शाळेत मातोश्री जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अनंत वाढेकर, परशुराम टाकले, शालिनी उंडे आदींची उपस्थिती होती.
नाल्यांची दुरवस्था
जालना : शहरांतर्गत भागातील काही ठिकाणच्या नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. पालिकेने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.