गाभाऱ्यातील परिवार देवतांपैकी श्री गणपती, देवी, गोपालकृष्ण, मल्लारी म्हाळसाकांत (खंडोबा), हनुमंत व तीन गरुड अशा एकूण आठ पंचधातूंच्या मूर्त्यांची अनेक वर्षांपासून होणाऱ्या धार्मिक उपचारांमुळे झीज झाली होती. त्यामुळे सुमारे ३२८ वर्षांनंतर शास्त्रानुसार त्यांचे नूतनीकरण करून विधीवत पुनर्प्रतिष्ठापणा करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम ९ ते १३ ऑगस्ट या कालावधीत पार पडले.
कार्यक्रमाचे देवाचे प्रतिनिधित्व म्हणून यजमानपद उदय पुजारी, गिरीश पुजारी, मयूर पुजारी व इतर पुजारी वृंदांनी सांभाळले. यावेळी आचार्य पांडुरंग देवउपाध्ये, गोविंदराव टोणपे, मिलिंद लाडसावंगीकर, शशिकांत अग्निहोत्री, संदेश लाडसावंगीकर, विनायक टोनपे, गजानन टोनपे, रमाकांत देव, प्रमोद जपे, गोविंद देव, विजय देवउपाध्ये, श्रीपाद गोंदकर यांनी पौरोहित्य सांभाळले. रामेश्वर पाठक यांनी कार्यक्रमाची सर्व सूत्र सांभाळली. श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांच्या पुढाकाराने हे कार्यक्रम पार पडले. संदेश लाडसावंगीकर यांनी संस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांना विधीची रूपरेषा व त्याचे महत्व विषद केले. परिवारमूर्ती नूतनीकरण करून कोल्हापूर येथून आणण्यासाठी प्रा. डॉ. किरण मोगरकर, मंगेश जगदाळे, मयूर पुजारी यांनी परिश्रम घेतले, तर सामग्री संस्थानचे व्यवस्थापक किशोर बिडकर व इतर कर्मचाऱ्यांनी उपलब्ध करून दिली.