जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा रविवारी मृत्यू झाला, तर रविवारीच २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोघांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ७४९ वर गेली असून, आजवर ३६७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत १३ हजार १५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील १३ जणांना कोरोनाची लागण झाली. मंठा शहरातील एकास कोरोनाची बाधा झाली. परतूर तालुक्यातील सातोना एक, आंबा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथील एकास कोरोनाची लागण झाली. अंबड शहरातील एक, तर तालुक्यातील शहागड एक, पाथरवाला येथील एकास कोरोनाची बाधा झाली. बदनापूर तालुक्यातील पाथर देलगाव येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी एक, बोरखेडी एक, आरदखेडा येथील एकास कोरोनाची बाधा झाली. भोकरदन तालुक्यातील मानपूर एक, तर बुलडाणा जिल्ह्यातील तीन, बीड येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात १९ हजार ८७७ जण संशयित आहेत. रविवारी ४७६ लाळेची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला. सध्या २२३ रुग्णांवर उपचार सुरू आहे.