जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा मंगळवारी मृत्यू झाला. मंगळवारीच २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उपचार घेणाऱ्या २८ जणांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार २७८ वर गेली असून, आजवर ३५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२ हजार ६८८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील १३ तर तालुक्यातील इंदेवाडी १, सुरा येथील एकास कोरोनाची बाधा झाली. मंठा शहरातील १ तर तालुक्यातील लवणी १, दुधा येथील एकास कोरोनाची लागण झाली. परतूर शहरातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. घनसावंगी तालुक्यातील कंडारी खु येथील १ तर अंबड शहरातील तिघांना कोरोनाची बाधा झाली. जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील एकास कोरोनाची लागण झाली. बुलडाणा जिल्ह्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात १९ हजार ३६७ जण संशयित आहेत. मंगळवारी २८० जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर २७८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, परतूर येथील के.जी.बी.व्ही येथील अलगीकरण कक्षात एकास ठेवण्यात आले आहे.
--------------