जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून काम करताना निमा अरोरा यांनी उल्लेखनीय काम केले आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुला- मुलींसाठी क्रीडा प्रबोधनी सुरू करण्यात आली आहे. या क्रीडा प्रबोधनीत ५० मुले, ५० मुली प्रशिक्षण घेत असून, त्यांच्या माेफत निवासाची सोय करण्यात आली आहे. शिवाय सुंदर माझं कार्यालय हा उपक्रमही त्यांनी हाती घेतला आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये रोपवाटिका निर्मितीचा उपक्रम हाती घेवून विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या संरक्षणाचे धडे दिले आहेत. विशेष म्हणजे, जालना येथील त्यांच्या कार्याची दखल घेवून शासनाने बचत गट सक्षमीकरणाच्या समिती अध्यक्षपदी अरोरा यांची नियुक्ती केली आहे. शासनाने नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, अरोरा यांची अकोला महानगरपालिकेत आयुक्त म्हणून बदली केली आहे. अरोरा यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
सीईओ निमा अरोरा यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:01 IST