शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी ४५५ कोटी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:05 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून जिल्ह्याला ४५५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आलेला निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ७० हजार ११८ पात्र लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजालना : लाभार्थींना रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू

जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून जिल्ह्याला ४५५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आलेला निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ७० हजार ११८ पात्र लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे. तशा आशयाचा संदेशही बँकांकडून लाभार्थ्यांना पाठवला जात आहे. लाभार्थी शेतकºयांचा आकडा वाढणार असून, त्या प्रमाणात निधीही बँकांना मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यशासनाने पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरुवात केली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख पंधरा हजार कुटुंबातील तीन लाख ९७ हजार शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले होते. अर्ज भरलेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या तयार करून त्याचे चावडी वाचन पूर्ण करण्यात आले. बँकांनाही आपल्याकडील कृषी कर्जदार शेतकºयांची संपूर्ण माहिती आॅनलाइन भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी तीन लाख १२ हजार शेतकºयांची माहिती महा वेबपोर्टलवर भरली आहे. आॅनलाइन भरलेले अर्ज आणि बँकांनी कर्जदार शेतकºयांची आॅनलाइन भरलेली माहिती याचे आधारकार्ड, खाते क्रमांक व अन्य माहितीच्या आधारे संगणकाद्वारे अ‍ॅटो पद्धतीने एकत्रिकरण करून संगणकाद्वारे सॉफ्टवेअरच्या साहाय्याने हिरवा, पिवळा आणि लाल अशा तीन याद्या तयार करण्यात आल्या. हिरव्या यादीत कर्जमाफीस तात्पुरते पात्र, पिवळ्या यादीत अर्ज भरताना कागदपत्रातील त्रुटींमुळे प्रलंबित शेतकºयांची नावे, तर लाल यादीत कर्जमाफीस तात्पुरते अपात्र शेतकºयांची नावे आहेत. याद्या अपडेट करताना बँक प्रशासनाचीही दमछाक झाली होती. प्रत्यक्षात महिनाभरात पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात केली होती. कागदपत्रांची जमावजमव आणि आॅनलाईन अपग्रेडेशन यामुळे अडचणीत भर पडली. परिणामी दोन महिने या प्रक्रियेस लागले. आता कर्जमाफीची प्रक्रिया सुरु झाली असून, दोन टप्प्यांत राज्य शासनाने ४५५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी थेट बँकांना दिला आहे. टप्प्याटप्प्याने पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केला जात आहे.