शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ असेल तरच रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:04 IST

स्वस्त धान्य वितरणात अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी आता केवळ आधार क्रमांक असणा-यांनाच ई-पॉस मशीनद्वारे स्वस्त धान्य वितरित केले जात आहे.

जालना : स्वस्त धान्य वितरणात अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी आता केवळ आधार क्रमांक असणा-यांनाच ई-पॉस मशीनद्वारे स्वस्त धान्य वितरित केले जात आहे. जिल्ह्यात आधार पडताळणीद्वारे सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली (एनबिल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम-एईपीडीएस) लागू करण्यात आल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना यापुढे आधार पडताळणीनंतरच धान्य वाटप करावे लागणार आहे.स्वस्त धान्याचा लाभ थेट लाभार्थ्याला मिळावा, रेशनच्या काळ्या बाजाराला आळा बसावा यासाठी जिल्ह्यात एप्रिल २०१७ पासून ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप पद्धत सुरू करण्यात आली आहे. गत सहा महिन्यांमध्ये ८५ टक्के धान्य वाटप याच पद्धतीने सुरू असून, आधार पडताळणीचे प्रमाण ६० टक्यांहून अधिक आहे. आॅनलाईन पद्धतीने आधार पडताळणीद्वारे धान्य वाटपात जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर असल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्ह्यात एईपीडीएस प्रणालीद्वारे धान्य वाटपाचे निर्देश पुरवठा विभागाला दिले आहेत. जिल्ह्यात एकूण तीन लाख २६ हजार रेशनकार्डधारक असून आधार सीडिंगचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या रेशनकार्ड धारकांना या पुढे आधार क्रमांक असेल तरच स्वस्त धान्याचे वाटप केले जाणार आहे. लाभार्र्थ्याना ई-पॉस मशीनवर आधार अद्ययावत करता येणार आहे. ज्या कुटुंबप्रमुखाकडे आधार क्रमांक उपलब्ध नसेल त्यांनी कुटुंबातील सदस्याचा आधार क्रमांक ई-पॉसमध्ये अपडेट करावा. अपवादात्मक परिस्थितीमध्ये आधार पडताळणी न झाल्यास धान्य वाटपासाठी नियुक्त अधिका-यांच्या परवानगीने लाभार्थ्यास धान्य वाटप केले जाणार आहे. आधार पडताळणी न करता धान्य वाटप केल्यास किंवा अन्य काही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित क्षेत्र अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई केली जाणार आहे.---------जिल्हा पुरवठा विभाग स्वस्त धान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. या पुढे रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्य आणण्यासाठी जाताना आधारकार्ड सोबत घेऊन जावे लागणार आहे.राजू नंदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी