शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आवक घटल्याने आंब्याचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:49 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्यांची आवक घटली आहे. परिणामी आंब्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने अक्षय्य तृतीयेला आंब्याची चव चाखणे सर्वसामान्यांना अवघड झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्यांची आवक घटली आहे. परिणामी आंब्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने अक्षय्य तृतीयेला आंब्याची चव चाखणे सर्वसामान्यांना अवघड झाले आहे.बेमोसमी हवामान आणि अवकाळी पावसामुळे फळाचा राजा असलेल्या आंब्याचा पिकाला चांगला फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाल्याने परिणामी बाजारात येणारा आंबा एक महिना उशिराने बाजारात दाखल झाला आहे. आंबा बाजारात येण्याची सुरूवातच असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी बंगळुरू, निजामाबाद, राजकोट, रायगड इ. ठिकाणांवरून लालबाग, हापूस, दसरी, केसर इ. आंब्यांची ४०० क्विंटल आवक झाली आहे. आंबा मोहरालाच असताना अवकाळी वारा वादळ आणि पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. परिणामी, गेल्या वर्षी याच महिन्यात आंब्याला ६० ते ७० टक्के मागणी होती. ती निम्म्यावर आली आहे. बाजारात आब्यांची आवक कमी असल्याने आंब्यांचे दर गगनाला भिडले आहेत. हापूस ४०० ते ५०० रूपये डझन, केसर १२० ते १५०, दसेरी ९० ते ११० लालबाग ९० ते १०० या भावाने विकला जात आहे. मात्र हेच दर गेल्या वर्षी अर्ध्यावर किमतीवर असल्याची माहिती व्यापा-यांनी दिली. मात्र भाव जास्त असल्याने अनेकांनी आंबा खरेदीकडे कानाडोळा केला. मात्र अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याचे दर वाढूनही अनेकांनी पूजेसाठी आंब्यांची खरेदी करावी लागली.

टॅग्स :MangoआंबाMarketबाजार