आष्टी येथील अमोल शिवाजी थोरात आणि अंगद पंडित थोरात (दोघे रा. आष्टी ता. परतूर) यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास पाटील गल्ली येथे एका घराच्या संरक्षक भिंतीवरून उडी घेवून घराची कडी वाजविली. तेथील महिला व तिच्या पतीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तर दुसऱ्या एक घरी याच दोघांनी महिलेचा विनयभंग केला व जाताना खिडकीत ठेवलेला मोबाईल घेऊन पळ काढला. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडित दोन्ही महिलांनी आष्टी पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून अमोल शिवाजी थोरात व अंगद पंडित थोरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सपोनि एस. बी. सानप यांनी भेट दिली. तपास पोना सुक्रे, पोना गौड हे करीत आहेत.
आष्टी येथे दोन महिलांचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST