शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

प्रदेशाध्यक्षांची गोपनीय बैठकीतून निवडणुकीची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:35 IST

: लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या प्रमुख निवडक पदाधिकाऱ्यांची राजूर येथे बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या प्रमुख निवडक पदाधिकाऱ्यांची राजूर येथे बैठक घेतली. त्यात आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात मंथन करण्यासह प्राथमिक व्यूहरचना निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.राजूर येथे रविवारी एका मंगलकार्यालयाच्या लॉन्सवर ही बैठक पार पडली. ही बैठक तब्बल तीन ते सोडेतीन तास चालली. यावेळी भविष्यात शिवसेने सोबत युती झाली तरी ठीक नसता, स्वबळावर लढल्यानंतर विरोधकास नामोहरम करण्यासाठी कोणकोणत्या मुद्यांचा आधार घ्यायाचा याचा कानमंत्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उपस्थितांना दिला. एकूणच या बैठकीत निवडक आणि विश्वासू पदाधिका-यांना निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीदरम्यान सर्वांचे मोबाईल स्विचआॅफ करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अंत्यत शिस्तबध्द पध्दतीने एक, एक विषय घेऊन त्यावर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.जालना लोकसभा मतदार संघात खा.दानवे हे १९९९ पासून लोकसभेवर निवडून जात आहेत. १९९९ मध्ये त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कृषीभूषण विजयअण्णा बोराडे तर काँग्रेसकडून जि.प.चे माजी अध्यक्ष ज्ञानदेव बांगर हे होते. त्यावेळी दानवे यांनी विजय मिळवला.२००४ साली भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उत्तमसिंग पवार यांच्यात थेट लढत झाली. दानवेंनी त्यांचाही पराभव केला. २००९ च्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात आ. कल्याण काळे हे होते. त्यांनी दानवे यांना चांगलाच घाम फोडला होता. त्यावेळी दानवे हे केवळ साडेआठ हजार मतांनी विजयी झाले होते. २०१४ मध्ये दानवेंच्या विरोधात औरंगाबाद येथील काँग्रेसचे नेते कल्याणराव औताडे यांनी लढत दिली. मात्र, मोदी लाटेत दानवे हे तब्बल अडीच लाख मतांनी विजयी झाले.या चारही निवडणुकीत शिवसेने सोबत भाजपची युती होती, हे विसरून चालणार नाही. त्यावेळी कोणी काम केले आणि कोणी केले नाही, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. आता मात्र, राजकीय परिस्थिती खूप बदलली आहे. शिवसेनेने स्वबळावर निवडणुक लढवण्याची डरकाळी फोडली आहे. त्यामुळे भाजप सतर्क न झाल्यास नवल. त्या दृष्टीने रविवारच्या बैठकीला राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र समजू शकले नाहीयुती होवो अथवा न होवोआगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेने सोबत युती झाली तरी ठिक आणि न झाली तरी आम्ही आमची तयारी सुरू केली आहे. आपल्या समोर काँग्रेस आणि शिवसेना या दोन्हींचे आव्हान लक्षात घेवून राजकीयपक्ष म्हणून आम्ही तयारीला लागलो आहोत. निवडणुका या नियोजन करूनच लढवाव्या लागातत, त्यामुळे आजची बैठक बोलावली होती. त्यात आम्ही काय करणार याची प्राथमिक चाचपणी करण्याचा प्रयत्न या बैठकीतून केला आहे.- रावसाहेब दानवे, खा. तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेPoliticsराजकारण