शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

रणरागिणी सरसावल्या : रोहिलागडमध्ये बाटली आडवी करण्यासाठी झाले मतदान, गावातील दारूचे दुकान होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 18:40 IST

अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी गुरुवारी गावात मतदान घेण्यात आले. गावातील एक हजार ४६४ पैकी ८४२ महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी मतदान केले.

ठळक मुद्देगावातील एक हजार ४६४ पैकी ८४२ महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी मतदान केले.रोहिलागड येथे पंधरा आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत दारू बंदी करण्याचा ठराव घेण्यात आला होता.

रोहिलागड ( जालना ) : अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी गुरुवारी गावात मतदान घेण्यात आले. गावातील एक हजार ४६४ पैकी ८४२ महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी मतदान केले. त्यामुळे गावातील हे दुकान बंद करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.

रोहिलागड येथे पंधरा आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत दारू बंदी करण्याचा ठराव घेण्यात आला होता. तसेच या पूर्वी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दारूबंदीची मागणी केली होती. मात्र, दारूबंदी न झाल्यामुळे महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. गावातील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी कायदेशीर मतदान घेण्याची मागणी ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली होती. त्यामुळे गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या उपस्थिती गावात ग्रामसभा घेण्यात आली.  या सभेला गावातील सुमारे दीड हजारांवर महिला उपस्थित होत्या. 

दारू बंदीच्या ठरावासाठी झालेल्या मतदानात ८४२ महिलांनी दारूचे दुकान बंद करावे यासाठी मतदान केले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी सरपंच आश्विनी वैद्य, ग्रामपंचायत सदस्य  बद्री टकले,  लताबाई टकले, सुरेश पाटील, किशोर टकले, प्रल्हाद वैद्य, राम दुधाटकर यांच्या उपस्थित ग्रामस्थांना एकत्र बोलावून दारूचे दुकान बंद न करण्यास कुणाचा आक्षेप आहे का याबाबत विचारणा केली. मात्र, सर्व महिलांनी गावातील दारूचे दुकान बंद व्हायलाच पाहिजे , असा पवित्रा घेतला. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी आवश्यक नोंदी घेऊन येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यात येईल, असे जाहीर केले.

राज्यउत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक भाग्यश्री जाधव, निरीक्षक एस.आर. फटागडे, जे. एम.  खिल्लारे,  दुय्यम निरीक्षक आर.डी. गायकवाड,  वि. के. चाळणेवार, विस्तार अधिकारी बी. जी. गुंजाळ, गटविकास अधिकारी यु. एन. जाधव यांनी ही कार्यवाही पूर्ण केली. यासाठी बाप्पासाहेब टकले, हनुमान तार्डे, नारायण टकले, हनुमान तार्डे, राहुल गुंजाळ,  विजय टकले, सुखदेव पाटील, कल्याण टकले, राम पाटील,  लक्ष्मण टकले, रंजित जाधव, तुळजीराम पांढरे, पिराजी ढोले, गंगाधर पाटील यांनी सहकार्य केले.