शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राजुरेश्वर मंदिराला पर्यटन स्थळाचा "अ" वर्ग दर्जा प्राप्त; २० एकरात उभारणार कृषी पर्यटन क्षेत्र

By विजय मुंडे  | Updated: June 19, 2024 19:51 IST

शासनाने एका वर्षात राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणारी ७० ते ८० लाख भाविकांची संख्या तसेच परदेशातून येणारे भाविक लक्षात घेवून अ वर्ग दर्जा दिला

जालना / राजूर : मराठवाडयातील प्रसिद्ध देवस्थान राजूर (ता.भोकरदन जि.जालना) येथील श्री राजुरेश्वर मंदिराला राज्य शासनाकडून पर्यटन स्थळाचा "अ" वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला आहे. देवस्थानला अ वर्ग दर्जा मिळाल्याने विकास कामाला चालना मिळणार आहे. राजूर भागातच २० एकरवर कृषी पर्यटन केंद्रही उभारले जाणार असल्याची माहिती माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

श्री गणपती संस्थानने गेल्या दोन वर्षापूर्वी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून राजुरेश्वर संस्थानला अ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती. यासाठी रावसाहेब दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने एका वर्षात राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणारी ७० ते ८० लाख भाविकांची संख्या तसेच परदेशातून येणारे भाविक लक्षात घेवून अ वर्ग दर्जा दिला असून, त्याचा अध्यादेश पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने बुधवारी १९ जून रोजी काढला आहे. राजुरेश्वर मंदिराला ऐतिहासिक व पुरातत्विय पार्श्वभूमी आहे. मंदिराला अ वर्गाचा दर्जा मिळाल्याने स्थानिक भाविक व परदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध होणार असल्याने विकास कामाला चालना मिळणार आहे. पर्यायाने आर्थिक उलाढालीत वाढ होवून राजूरच्या वैभवात भर पडणार आहे. दरम्यान, याच परिसरात २० एकरात कृषी पर्यटन केंद्र उभारले जाणार आहे. शेतकरी, विद्यार्थ्यांच्या सहली होणार असून, शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तेथे मुलांसाठी मनोरंजनाचे साहित्य, वाचनालय राहणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.

संस्थानला मिळणाऱ्या निधीत वाढ गेल्या दोन वर्षापूर्वी श्री गणपती संस्थानने शासनाकडे मंदिराला पर्यटनस्थळाचा अ वर्गात समावेश करण्याची मागणी केली होती. यासाठी माजी केंद्रिय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मेाठे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याने संस्थानला मिळणाऱ्या निधीत वाढ होणार असून, विकास कामाला चालना मिळणार आहे.- गणेश साबळे, व्यवस्थापक, श्री गणपती संस्थान राजूर

राजूरचे नांव आता जगाच्या नकाशावरराजुरेश्वर मंदिराला अ वर्ग दर्जा मिळाल्याने राजूरचे नांव आता जगाच्या नकाशावर आले आहे. ही राजूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. शासनाकडून गणपती संस्थानला मेल मिळाला आहे.- प्रशांत दानवे, कार्यालयीन अधीक्षक गणपती संस्थान राजूर

 

टॅग्स :Jalanaजालनाspiritualअध्यात्मिकtourismपर्यटन