जालन्यातील भाजपच्या संभाजीनगर कार्यालयात सकाळी जल्लोष साजरा करण्यात आला. ढोलताशे आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पेढे भरविले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, बद्रिनाथ पठाडे, प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष अशोक पांगारकर, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस अतिक खान, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस संध्या देठे, प्रतीक दानवे, जिल्हा सरचिटणीस सिध्दिविनायक मुळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, प्रदेश वैद्यकीय आघाडी सदस्य अमोल कारंजेकर, बाबासाहेब पाटील कोलते, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सतीश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, जिल्हा चिटणीस रोषण चौधरी, सोपान पेंढारकर, सुनील राठी, नगरसेवक महेश निकम, योगेश लहाने, सिध्देश्वर हसबे, तुलजेश चौधरी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रवी अग्रवाल, संजय डोंगरे, देवचंद बहुरे, शहर संघटन सरचिटणीस मयुर ठाकूर, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष सुभाष सले, अर्जुन गेही आदींसह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
--------------------------------------------------------
चौकट
भोकरदन, जाफराबादेत जल्लोष
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेच्या असलेल्या रेल्वे तसेच खाण आणि कोळसा मंत्रालयाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोपविली आहे. त्यांच्या या निवडीने भोकरदन तसेच जाफराबाद तालुक्यात जल्लोष साजरा करण्यात आला. जाफराबाद येथे भाजप तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, सभापती दगडूबा गोरे, दीपक वाकडे, उपसभापती जगन पंडित, सुधीर पाटील, उद्धव दुनगहू, अरुण अवकाळे, कौसर शेख, साहेबराव लोखंडे, निवृत्ती दिवटे, गजानन काळे, अशोक कणखर, सचिन जैस्वाल, युनूस भाई, विजय शेवत्रे आदी, तर भोकरदन येथे राहुल ठाकूर, दीपक मोरे, अनिल उबाळे, आत्माराम गव्हाणे, गजानन तादुळजे, राजू सहाने, विजय मतकर, सुनील पाथरे, शांताराम गव्हाणे आदी उपस्थित होते. टेंभुर्णी येथे मधुकर गाढे, दगडुबा गोरे, लक्ष्मण शिंदे, फैसल चाऊस, गौतम म्हस्के, भिकनखा पठाण, दत्ता सोनसाळे, राजू खोत, प्रदीप भोपळे, अलकेश सोमानी, शेख सैफ, ज्ञानेश्वर उखर्डे, शिवाजी खांडेभराड, मनोज शिंदे, उद्धव दुनगहू, सचिन देशमुख, सुरेश सोळंके, शरद गायमुखे.