दाभाडी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रम
दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक पंढरीनाथ खरात, महेश देशमुख, ओळेकर, सोपान जैवाळ, गिरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
‘मत्स्योदरी’च्या १५० विद्यार्थ्यांची निवड
जालना : येथील मत्स्योदरी अभियांत्रिकी विद्यालयातील १५० हून अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकमंत्री राजेश टोपे, संस्था सचिव मनीषा टोपे, प्रशासकीय अधिकारी बी. आर. गायकवाड, प्राचार्य एस. के. बिरादार आदींनी कौतुक केले आहे.
मंठ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ
मंठा : मंठा शहर व परिसरात गत काही महिन्यांपासून दुचाकी चोरांनी एकच धुमाकूळ घातला आहे. सोपान वैद्य यांची दुचाकी लंपास करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधितांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढलेल्या दुचाकी चोऱ्या पोलिसांनी रोखाव्यात, अशी मागणी होत आहे.