शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कच-यातून खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:37 IST

ओल्या कच-यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी जालना पालिकेने पुढाकार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ओल्या कच-यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी जालना पालिकेने पुढाकार घेतला आहे. पालिका प्रशासन, सामाजिक संघटना आणि जनतेच्या सहकार्यातून शहरात प्रभागनिहाय खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, या कामात सर्वांंनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी गुरुवारी येथे केले.जालना नगर परिषदेतर्फे ओल्या कच-यापासून खत निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रायोगिक तत्त्वावर मोतीबाग उद्यानात आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी गोरंट्याल बोलत होत्या. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी उपनगराध्यक्ष शाह आलम खान, इसा खा पठाण, राधाकिसन दाभाडे, विष्णू वाघमारे, रोहित बनवस्कर, स्वच्छता विभाग प्रमुख माधव जमधडे, अनिरुध्द निरंतर, शशांक कुलकर्णी, संदीप पाटील, डॉ. संजय रु ईखेडकर, नटराज चौधरी आदी उपस्थित होते.नगराध्यक्षा म्हणाल्या की, जालना शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या कामाला गेल्या काही दिवसांत निश्चितपणे गती आली असून, या कामात सर्वांनीच पुढाकार घेतल्याचे समाधान होत आहे. ओला आणि सुका कचरा यापूर्वी रेवगाव रोडवरील कचरा डेपोमध्ये पाठवला जात होता.आता मात्र बॅक्टेरियल कल्चर जिवाणूच्या माध्यमातून ओल्या कच-यापासून खत निर्मिती करण्यासाठी जालना पालिकेने पुढाकार घेतला आहे.एकीकडे खत निर्मितीच्या माध्यमातून पालिकेला मासिक उत्पन्न मिळण्याबरोबरच दुसरीकडे शहर स्वच्छतेसाठी मोठी मदत अशा प्रकल्पामुळे होणार आहे. एका प्रकल्पाची खतनिर्मितीची क्षमता ११०० किलो इतकी राहणार असून, तीस ते चाळीस दिवसांत खत तयार होणार आहे.तयार झालेल्या खताचे नमुने तपासणीसाठी कृषी खात्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगून संबंधित विभागाने प्रमाणित केल्यानंतर नगर परिषदेमार्फत तयार सेंद्रीय खत शेतक-यांना विक्री केले जाईल. प्रभागाबरोबरच जालना पालिकेच्या मागील बाजूस, जलशुध्दीकरण केंद्राच्या जागेत अशा प्रकारचे खत निर्मितीचे प्रकल्प सुरु करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.कोल्हापूर येथील अनिरुद्ध निरंतर यांनी उपस्थितांना ओल्या कचºयापासून खतनिर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवून यासंदर्भात मार्गदर्शन केले. आतापर्यंत राज्यातील जवळपास ३५ नगरपालिकांनी हा प्रकल्प सुुरु केलेला असून, त्यातून काही नगरपालिकांना उत्पन्नदेखील मिळू लागल्याचे त्यांनी सांगितले.