जालना येथील औद्योगिक वसाहतीचा दुसरा टप्पा परिसरातील रस्ते हे धोकादायक बनल आहेत. दुर्गाकाटा ते भाग्यलक्ष्मी स्टील या रस्त्यावर मेाठे खड्डे पडले असून, अर्धा फुटांपर्यंत ते खोल आहेत. रात्री या भागात दररोजच अपघात होत आहेत. तसेच ट्रकची ये-जा वाढल्याने सध्या दिवसा आणि रात्री देखील या भागात ट्रकच्या रांगा लागून वाहतूकीची कोंडी होत आहे.
दोन वर्षापूर्वीच या रस्त्याची डागडूजी केली होती. परंतु अतिरिक्त लोड घेऊन जाणाऱ्या हेवी वाहतूकीचा परिणाम रस्ते खराब होण्यावर होत आहे.
या भागातील जिल्हा उद्योग केंद्र ते कालिका स्टील तसेच भाग्यलक्ष्मी स्टील चौक ते राजूरी, आयकॉन स्टीलसह गीताईकडे जाणाऱ्या रस्त्यांची रूंदी वाढविणे गरजेचे झाले असून, वाहतूक कोंडीचा फटका हा याभागातील उद्योजकांसह अन्य नागरिकांना सोसावा लागत आहे. या भागातील रस्ते एमआयडीसीने चांगले करावेत अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते.