शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:28 IST

दिल्ली- मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये जालना शहरास महत्त्व येणार आहे. अनेक मोठे उद्योग शहरात येत असून, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे प्रतिपादन अर्जुन खोतकर यांनी केले.

ठळक मुद्देअर्जुन खोतकर : काँग्रेसच्या राजवटीत विकासाला खीळ बसली होती

जालना : काँग्रेसच्या राजवटीत जालना शहरातील विकासाला बसलेली खीळ महायुतीच्या सरकारने दूर केली. थेट निधी देऊन शहराचा विकास वेगवान केला आहे. रस्ते, अंतर्गत जलवाहिनी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अशा पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले. दिल्ली- मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये जालना शहरास महत्त्व येणार आहे. अनेक मोठे उद्योग शहरात येत असून, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे प्रतिपादन अर्जुन खोतकर यांनी केले.जालना शहरातील दर्गा वेस व शंकर नगर भागात गुरूवारी रात्री झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष अ‍ॅड.ब्रम्हानंद चव्हाण, पंडित भुतेकर, रावसाहेब राऊत, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त, सतीश वाहुळे, नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे, संतोष जांगडे, राम सतकर, ज्ञानेश्वर सुपारकर, घनश्याम खाकीवाले, प्रा. राजेंद्र भोसले, देवीलाल भगत, महेश दुसाने, शैलेश घुमारे, भरत कुसुंदल, दिनेश भागत, दुर्गेश काठोठीवाले, गणेश सुपारकर, संतोष सलामपुरे, सुशील भावसार, लखन कणीसे, संतोष जमधडे आदींची उपस्थिती होती.खोतकर म्हणाले, सत्तेचा उपयोग आपण जनतेसाठी केला म्हणूनच मतदार आमच्या पाठीशी उभे राहतात. जनतेचे प्रेम हाच आपला श्वास असून, दिल्ली ते गल्ली एकच सरकार असेल तर विकासासाठी त्याचा फायदा होतो. विरोधी पक्षाचा उमेदवार विजयी झाल्यास विकासाला खीळ बसेल, याचा विचार करून सुज्ञ शहरवासियांनी विकासाचे भागीदार होण्यासाठी आपल्याला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही खोतकर यांनी केले.यावेळी रावसाहेब राऊत, विष्णू पाचफुले, सतीश वाहुळे, शैलेश घुमारे, प्रा. राजेंद्र भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आशिष रसाळ यांनी केले तर ज्ञानेश्वर सुपारकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील महिला, नागरिक व तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.खोतकरांना विजयी करा-पकंजा मुंडेचे आवाहनराज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनीही जालना विधानसभेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. एका व्हिडीओ क्लिपव्दारे त्यांनी हे आवाहन केले असून मुंडे आणि खोतकर यांचे पारिवारीक संबंध असून अर्जुन खोतकर हे माझे मोठे बंधु आहेत, असे भावनिक आवाहन मुंडे यांनी केले आहे.

टॅग्स :JalanaजालनाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Arjun Khotkarअर्जुन खोतकरShiv Senaशिवसेना