फोटो
जालना : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात तब्बल २ लाख २९ हजार ३६१ बालकांना पोलिओ लसीचा डोस देण्यात आला. ग्रामीण भागात ९५ टक्के तर शहरी भागात ७८ टक्के असे एकूण दिवसभरात ९५ टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
घनसावंगी ग्रामीण रूग्णालयात रविवारी राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील १७४७ बुथवर ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील २ लाख ४८ हजार २६ बालकांना पोलिओचा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हाभरात ४७४७ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. जिल्हाभरातील १७४७ बुथवर २ लाख १९ हजार ४४७ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. ११८ मोबाईल टीमच्या माध्यमातून ४४६५ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. तर २०२ ट्रान्झीट टीमकडून ५४४९ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील एकूण १ लाख ९६ हजार १९३ बालकांपैकी १ लाख ८८ हजार १६३ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला आहे. यात बुथवर १ लाख ८० हजार ५३५ बालकांना, मोबाईल टीमकडून ३७६४ बालकांना तर ट्रान्झीट टीमकडून ३८८२ बालकांना डोस देण्यात आला आहे. ग्रामीण भागाची स्थिती पाहता अंबड तालुक्यात ९३ टक्के, बदनापूर तालुक्यात ९५ टक्के, भोकरदन तालुक्यात ९५ टक्के, घनसावंगी तालुक्यात ९४ टक्के, जाफराबाद तालुक्यात ९६ टक्के व जालना तालक्यातील ग्रामीण भागात ९५ टक्के पोलिओ लसीकरण पूर्ण झाले आहे.
पाच वर्षावरील २९०३ लाभार्थ्यांना दिला डोस
जिल्ह्यातील पाच वर्षांवरील २९०३ लाभार्थ्यांनाही या मोहिमेत पोलिओचा डोस देण्यात आला आहे. यात बुथवर २७८६ बालकांना, मोबाईल टीमकडून ४६ बालकांना तर ट्रान्झीट टीमकडून ७१ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला आहे.
कोट
शहरी भागात झालेले लसीकरण
शहर टक्केवारी
जालना ७४
अंबड ८१
भोकरदन ९४
परतूर ९०
कोट
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ९१ टक्के बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला आहे. उर्वरित नऊ टक्के बालकांना घरोघरी जावून पोलिओचा डोस दिला जाणार आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरूवार या तीन दिवसांत आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेवक, आरोग्यसेविका घरोघरी जावून यादीनुसार उर्वरित बालकांना पोलिओचा डोस दिला जाणार आहे.
डॉ. विवेक खतगावकर
जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना