शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉटिंग व्यावसायिकाचा जालन्यात भरदिवसा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 22:42 IST

जालना शहरातील प्लॉटिंग व्यावसायिक नितीन ताराचंद कटारिया (३९) यांचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना मोदीखाना भागात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपाच संशयित ताब्यात

जालना : शहरातील प्लॉटिंग व्यावसायिक नितीन ताराचंद कटारिया (३९) यांचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना मोदीखाना भागात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे.मारेकºयांना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने कटारिया यांचा मृतदेह सदरबाजार पोलीस ठाण्यात आणल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. याप्रकरणी दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दुपारी चारच्या सुमारास मोदीखाना परिसरातील रुपानिवास येथे दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांना घराबाहेर बोलाविले. कटारिया बाहेर आल्यानंतर काही कळायच्या आतच त्याने कटारिया यांच्या गळ्यावर, पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कटारिया यांना स्वत:चा बचाव करण्याची संधी मिळाली नाही. ते घरासमोरील रस्यावरच रक्ताच्या थोराळ्यात पडले. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून (क्र.११११) फरार झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी जखमी कटारिया यांना तात्काळ येथील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाने कटारिया यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून सदर बाजार पोलीस ठाण्यात आणला. संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ठाण्यातून नेणार नाही, असे भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला.

या प्रकरणी मृत कटारिया यांचे वडील ताराचंद कटारिया यांच्या फिर्यादीवरून संशयित  सुनील रुपा खरे (३५, रा. खवामार्केट), चंदू धन्नू घोचिवाले (३२), अब्दुल रहीम सत्तार खान उर्फ सादेक खान (४२, रा.राममुर्ती) शकील बुरान घोचिवाले (३०), हमीद बुरान घोचिवाले (२७) सलीम बुरान घोचिवाले (३०), अफजल लल्लू मुन्नीवाले (२६), अकबर बुरान घोचिवाले यांच्यासह एक महिला व अज्ञात मारेकºयाविरुद्ध खुनाचा कट रचने व खून करणे या कलमांनुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतल्याचे सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी सांगितले.काय आहे प्रकरण?प्लॉटिंग व्यावसायिक असणाºया नितीन कटारिया यांची खरपुडी शिवारात जमीन आहे. सहा महिन्यांपूर्वी सुनील खरे, चंदू घोचिवाले व अब्दुल रहीम सत्तार यांनी कटारिया यांना मारहाण करून पन्नास लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार कटारिया यांनी पोलिसांकडे केली होती. मात्र, गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याने कटारिया यांनी कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने वरील संशयितांवर सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यांनतर दुसºयाच दिवशी कटारिया यांचा खून झाला.

 

पोलिसांकडे मागितले होते संरक्षणनितीन कटारिया यांना वारंवार धमक्या येत होत्या. त्यामुळे एक दिवस माझाही गोविंद गगराणी होईल, मला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी कटारिया यांनी पोलिसांकडे केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले. पोलिसांनी वेळेत संरक्षण दिले असते तर हा प्रकार घडलाच नसता, अशी भावना व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.