शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सुखद ! कोरोना काळातही जालना बाजार समितीच्या उलाढालीत ३०० कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 17:24 IST

जालन्यासह शेजारील विदर्भातूनही जालना बाजार समितीत माल विक्रीसाठी येत आहे.

ठळक मुद्देजालन्यातील बाजार समितीत सोयाबीनचे दर मध्यंतरी थेट सात हजार ४०० रुपयांवर पोहोचले होते, जे की विक्रमी मानले जातात. बाजार समितीच्या संचालक मंडळाने कोरोना काळातही स्वत: बाजारात येऊन अडचणींची सोडवणूक केल्याने उलाढाल वाढल्याचे सांगण्यात आले.

- संजय देशमुख

जालना : राज्यातील पहिल्या पाच बाजार समितीत मोडणाऱ्या जालना बाजार समितीने कोरोना काळातही उत्कृष्ट कामगिरी करीत उलाढाल वाढविली आहे. ही उलाढाल जवळपास ३०० कोटींनी वाढली असून, चालू आर्थिक वर्षात ही उलाढाल थेट ९०० कोटींवर पोहोचली आहे. यातून बाजार समितीस ११ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाला आहे. जालना बाजार समिती ही राज्यात रोखीने व्यवहार करण्यासाठी प्रसिद्ध असून, येथील घाऊक व्यापारी हे भुसार मालाची आवक बाजार समितीत झाल्यास लगेचच त्यांचे पैसे अदा करत असल्याने येथे व्यवहाराला मोठे महत्त्व प्राप्त होते. जालन्यासह शेजारील विदर्भातूनही जालना बाजार समितीत माल विक्रीसाठी येत आहे. विशेष करून कोरोना काळात सर्वत्र भयावह चित्र असतानाही बाजार समितीचे सभापती तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी यासाठी जातीने लक्ष घालून शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना मोठी मदत केल्यानेच हे शक्य झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे यांनी सांगितले.

गेल्या आर्थिक वर्षात भुसार, शेती तसेच कृषी मालाची मोठी आवक झाली. त्यात विशेष करून सोयाबीन आणि कपाशीचा मोठा समावेश होता. जालन्यातील बाजार समितीत सोयाबीनचे दर मध्यंतरी थेट सात हजार ४०० रुपयांवर पोहोचले होते, जे की विक्रमी मानले जातात. कापूस खरेदीसाठीदेखील बाजार समितीचे सभापती खोतकर यांनी पणन महासंघाची मुदत संपल्यावरही शेततकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर कापूस शिल्लक होता. त्यासाठी जिनिंग मालकांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी केला. तो साठवणुकीसाठी मोठमोठे पत्राचे शेड उभारून त्यात कापूस साठवून नंतर तो जिनिंगमध्ये गठाण तयार करण्यासाठी पाठविण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मध्यंतरी बाजार समितीचे जे शुल्क होते, ते मिळण्यास अडचणी येत होत्या. हे शुल्क रद्द केले होते. त्याला न्यायालयात आव्हान दिल्यावर त्यात बाजार समितीचे हक्काचे शुल्क हे राज्य सरकारने त्यांना दिलेच पाहिजे असे आदेश न्यायालयाने दिल्याने ते थकलेले ४० लाख रुपये देखील लवकरच प्राप्त होतील असेही इंगळे यांनी सांगितले. बाजार समितीच्या संचालक मंडळाने कोरोना काळातही स्वत: बाजारात येऊन अडचणींची सोडवणूक केल्याने उलाढाल वाढल्याचे सांगण्यात आले.

शेतकरी, व्यापाऱ्यांचे हित महत्त्वाचेबाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापारी यांना अडचण येऊ नये हा हेतू आहे. तसेच गेल्या दीड वर्षात कोरोनाचा कहर होता. अशाही स्थितीत शेतकऱ्यांनी घाम गाळून उत्पादित केलेल्या मालाची विक्री करताना त्यांना अडचण येऊ नये. तसेच व्यापाऱ्यांनाही या मालाची खरेदी करण्यासाठी मदत केली. या समन्वयामुळे जालना बाजार समितीची उलाढाल ही ९०० कोटींवर पोहोचली आहे. यातून बाजार समितीस ११ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाला आहे. विविध बँकांकडून बाजार समितीने घेतलेले कर्ज पूर्ण परतफेड केल्याने बाजार समिती स्वयंपूर्ण झाली आहे.- अर्जुन खोतकर, सभापती, बाजार समिती जालना,

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरAgriculture Sectorशेती क्षेत्रJalanaजालना