शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

रस्त्याची दुरवस्था जालना : तालुक्यातील निरखेडा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या ...

रस्त्याची दुरवस्था

जालना : तालुक्यातील निरखेडा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.

कारवाईची मागणी

भोकरदन : शहर परिसरात अवैधरीत्या दारूविक्री वाढली आहे. दारूमुळे भांडण- तंट्यात वाढ झाली आहे. तळीरामांमुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कारवाईची मागणी होत आहे.

सिग्नलकडे दुर्लक्ष

जालना : शहरात मामा चाैक, शनिमंदिर येथे सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. परंतु, वाहनधारक सिग्नल तोडत असल्याने वाहतूक ठप्प होत आहे.

मोबाईल धारक त्रस्त

बदनापूर : शहरासह परिसरातील बीएसएनएलची सेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे मोबाईल धारक त्रस्त झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी होत आहे.

दहेगाव खुर्द येथे स्वस्त धान्याचे वाटप

अंबड : अंबड तालुक्यातील दहेगाव खुर्द येथे सोमवारी स्वस्त धान्य वाटप करण्यात आले. यावेळी स्वस्त धान्य दुकानदार रामकिसन औटी यांनी गावकऱ्यांना गहू व तांदळाचे वाटप केले. शासनाने कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आदेश दिलेले असल्यामुळे त्याठिकाणी सर्व नियम पालन करण आले. यावेळी गावातील गावकरी दिलीप जाधव, अरुण जाधव, सचिन लहांगे, संतोष भाकड, राजेंद्र भाकड, राजेंद्र जाधव यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

साबळे कुटुंबाला तरूणांकडून मदत

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील मदत फाउंडेशनच्या वतीने अपघातग्रस्त माधव साबळे यांना तब्बल एक लाख तीस हजार रुपयांची मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. मदत फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पडोळ हे नेहमी तालुक्यातील गरजवंतांसाठी मदतीचा हात पुढे करुन आपले समाजाप्रती काही देणं असतं या भावनेतून मदत करतात. माधव साबळे यांच्या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंट वरून मदतीसाठी मित्रपरिवाराला पुढे येण्याची विनंती केली. यानंतर अवघ्या काही दिवसांतच तब्बल एक लाख तीस हजार रुपयांची मदत जमा करून माधव साबळे यांना पुढील उपचारासाठी देऊ केली.

डावरगाव नदीपात्रातून ट्रॅक्टर जप्त

जाफराबाद : तालुक्यातील डावरगाव देवी येथील पूर्णा नदी पात्रात रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अवैधरीत्या ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून वाहतूक करताना तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाने तीन ट्रॅक्टर पकडले. जाफराबाद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा सुरू असून, यासंदर्भात वेळोवेळी तहसील प्रशासनाकडून कारवाई केली जाते. ही कारवाई नायब तहसीलदार केशव डकले, तलाठी आय.के.पठाण, प्रभाकर शेनवड यांनी केली.

राजकीय आरक्षण अबाधित ठेवा

जालना : भाजपा ओबीसी मोर्चा जालनाच्या वतीने १४ जून रोजी जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक निवदेन देण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे व पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवणे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर शहराध्यक्ष सोमेश काबलीये यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जीवनावश्यक किटचे महिलांना वाटप

भोकरदन : भोकरदन येथे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वृक्षारोपण तसेच नगर परिषदेच्या सफाई कामगार महिलांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, गटविकास अधिकारी वी. डी. राजपूत, उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, भूषण शर्मा, शेख नजीर, महेश पुरोहित, सुरेश तळेकर, शफीक पठाण, सुरेश कचके, विठ्ठल पवार, गणेश इंगळे, ईश्वर इंगळे, शेख रईस आदींची उपस्थिती होती.

रोहित्र जळाल्याने अर्धेगाव अंधारात

धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथे झोपडपट्टीसह समतानगर व गावात वीज पुरवठा करण्यासाठी सात रोहित्राची गरज असून, ही पाच रोहित्रावर संपूर्ण गावाचा भार असल्याने गट्टू जळण्याचेे प्रकार वारंवार घडत आहे. सध्या पाच पैकी तीन रोहित्रावरचे पाच गट्टू जळाल्याने अर्ध्या गावात अंधार व कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ उकाड्याने त्रस्त झाले असून, कमी दाबाने व सुरळीत वीजपुरवठा होत नाही. बँकात सर्व्हर चालत नसल्याने बँकेचे व्यवहार ठप्प होत आहे.