कृषिपंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी
मंठा : थकीत वीज बिलासाठी महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी मनसेच्या वतीने मंठा येथील महावितरणच्या कार्यालयात दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष राजेश खरात, तालुकाध्यक्ष गणेश बोराडे, भाऊसाहेब खंदारे, संजय हनवते, सुरेश घनवट, केशव शिंदे, डॉ. प्रल्हाद गडधे, भागवत मुरतुडकर आदींची उपस्थिती होती.
गोद्री गावातील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
भोकरदन : तालुक्यातील गोद्री येथील ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकारी, सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच असमाबी पठाण, उपसरपंच जिजाबाई सुरडकर, शेख अलीम शेख सलीम, अंबादास सपकाळ, हरिभाऊ जोगदंड, शेंफडाबाई निकाळजे, शालीकराम बोराडे, जावेद पठाण, शेख अन्सार, युनूस शहा, सचिन सुरडकर आदींची उपस्थिती होती.
शालेय विद्यार्थिनींची हिमोग्लोबीन तपासणी
घनसावंगी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुका अखिल भारतीय मराठा महासंघ, ग्रामीण रुग्णालय व एकता सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय मुलींची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. कार्यक्रमास प्रदीप जाधव, लहू मिसाळ, बोररांजणीचे सरपंच परमेश्वर जाधव, ज्ञानेश्वर उढाण, श्रीकृष्ण यादव, किशोर यादव आदींची उपस्थिती होती.
स्त्री रुग्णालयात अभिवादन कार्यक्रम
जालना : शहरातील स्त्री रुग्णालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अधीक्षक डॉ. राजेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास मनिष जाधव, अनंता खार्डे, कायंदे, जोशी, निर्मल, अनथोनी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.