९ सदस्य असलेल्या पानेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि मनसे, या तीन पॅनलचे २७ उमेदवार रिंगणात आहेत. पानेवाडी ग्रामपंचायतीचे दोन हजार ५५० मतदान असून, यासाठी तीन वॉर्ड आहेत. जिल्हा परिषदेच्या राणी उंचेगाव गटाचे काँग्रेस, राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य, शिवसेना, भाजपचे घनसावंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि मनसेचे जिल्हा कार्यकारिणी नेतृत्व यांच्या तीन पॅनलमध्ये या ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे.
९ सदस्य असलेल्या रवना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १ हजार ८०० मतदान आहे. या ग्रामपंचातच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी- काँग्रेसचे दोन गट होऊन या दोन गटांच्या दोन पॅनलमध्ये निवडणूक होत आहेत. वॉर्ड क्रमांक तीनमधील तीन सदस्य बिनविरोध निवडीसाठी आल्याने आता सहा जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे घनसावंगी तालुक्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते यांच्या दोन पॅनलमध्ये निवडणुकीची चुरश होत आहे.