जालना : जालना शहरातील आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्रात अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अरूण सरदार, राजेंद्र ठोंबरे, अभिजीत शेजवळ, नवीनकुमार ठोंबरे, आनंद लोखंडे, विवेक ठोंबरे आदी उपस्थित होते.
एकाविरूध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा
जालना : व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेच्या घरातून बळजबरीने साहित्य नेणाऱ्याला सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून आयशर व साहित्य जप्त करण्यात आले. किशोर भिंगारे असे संशयिताचे नाव आहे. साईनगर येथील आशाबाई सरकटे यांना २०१८ साली भिकाजी भिंगारे यांनी व्याजाने ९ लाख रूपये दिले होते. परंतु, आशाबाई सरकटे यांनी व्याजाचे पैसे परत दिले नाही. त्यामुळे भिकाजी भिंगारे यांचा मुलगा नीलेश भिंगारे याने आशाबाई यांच्या घरातील साहित्य बळजबरीने नेले. याप्रकरणी आशाबाई सरकटे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी दिली.