शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

भरपाईसाठी केवळ २५ कोटींची मागणी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:43 IST

बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अंतीम अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय कृषी सहसंचालकांकडे पाठवला आहे. त्यानुसार जिरायती, बागायती व फळपिके मिळवून २१ हजार ६७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान दर्शविण्यात आले असून, भरपाईपोटी एकूण २५ कोटी रुपयांच्या निधीची अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद आहे. दरम्यान, ही मदत म्हणजे गारपिटीग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे सांगत शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अंतीम अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय कृषी सहसंचालकांकडे पाठवला आहे. त्यानुसार जिरायती, बागायती व फळपिके मिळवून २१ हजार ६७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान दर्शविण्यात आले असून, भरपाईपोटी एकूण २५ कोटी रुपयांच्या निधीची अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद आहे. दरम्यान, ही मदत म्हणजे गारपिटीग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे सांगत शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.मागील महिन्यात ११ फेब्रुवारीला जालना, मंठा, परतूर, जाफराबाद, घनसावंगी व अंबड तालुक्यात अवकाळी पावसासह काही मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे गहू, ज्वारी, कांदा, हरभरा या हंगामी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. मोसंबी, द्राक्ष व शेडनेट हाऊसला गारिपीटीचा सर्वाधिक फटका बसला होता. गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने संयुक्तरीत्या पूर्ण केले. या अंतीम अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत विभागीय कृषी सहसंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. जिरायती व बागायत पिकांचे ३३ -५० टक्क्यांपर्यंत जाफराबाद, अंबड व जालना तालुक्यात फळपिकांचे अनुक्रमे ६२६.०९, ६४० व १०७.२ हेक्टरचे नुकसान झाले आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीमध्ये जालना तालुक्यात द्राक्ष बागांचे सर्वाधिक १२०२.०४ हेक्टर क्षेत्राचे व मंठा तालुक्यातील ९५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शेतक-यांना भरपाई मिळावी यासाठीचा अहवाल पाठविण्यात आल्याचे कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी सांगितले.जिल्ह्यात ३३-५० टक्क्यांपर्यंत नुकसान झालेल्या जिरायती पिकांना प्रति हेक्टर सहा हजार ८००, बागायती क्षेत्राला तेरा हजार ५०० व फळपिकांना १८ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झालेल्या एकूण आठ हजार ३०७.०२ हेक्टर क्षेत्रासाठी दहा कोटी ८० लाख १५ हजार ३३५ रुपयांच्या निधीची गरज आहे. तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या तेरा हजार ३७२.१५ हेक्टर क्षेत्रासाठी १४ कोटी २२ लाख ९३९६ रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद आहे.